विंडीजची वाटचाल विजयाकडे
By Admin | Updated: June 20, 2014 23:59 IST2014-06-20T23:59:22+5:302014-06-20T23:59:22+5:30
वेस्ट इंडिजने पहिल्या डावात घेतलेल्या 239 धावांचा पाठलाग करताना न्युझीलंडची दैना उडाली.

विंडीजची वाटचाल विजयाकडे
>पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजने पहिल्या डावात घेतलेल्या 239 धावांचा पाठलाग करताना न्युझीलंडची दैना उडाली. असे असली तरी त्यांनी संयमी खेळ करत पाचव्या दिवशी 148 षटकार्पयत 9 बाद 32क् धावा करून 81 धावांची आघाडी घेतली होती. बि जे वॉटलींग आणि मार्क क्रेग यांनी अर्धशतकी खेळ करून संघाला ही आघाडी मिळवून दिली.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी 8 बाद 257 धावांवर असलेल्या किवींनी पाचव्या दिवशी चांगला खेळ केला. त्यांना पहिल्या डावातील आघाडीही भरून काढता येणार नाही असे चिन्ह दिसत असताना वॉटलींग आणि क्रेग या जोडीने संघाला सावरले. नवव्या विकेटसाठी 99 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीच्या बळावर किवींनी 81 धावांची आघाडी घेतली. वॉटलिंगने 197 चेंडूंचा सामना करत 3 चौकारांसह 59 धावा केल्या होत्या, तर क्रेग 167 चेंडूंत 9 चौकार ठोकून 67 धावांवर माघारी परतला होता. विंडिजकडून जेसन टेलर व सुलेमान बेन याने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. केमार 4 विकेट्स घेतल्या. (वृत्तसंस्था)