वेस्ट इंडिज अंतिम फेरीत, भारतावर सात गडी राखून मात
By Admin | Updated: March 31, 2016 23:01 IST2016-03-31T21:46:18+5:302016-03-31T23:01:28+5:30
फलंदाज जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अंतिम फेरीत धकड मारली आहे. टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत भारताचा धावांनी वेस्ट

वेस्ट इंडिज अंतिम फेरीत, भारतावर सात गडी राखून मात
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - फलंदाज जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने अंतिम फेरीत धडक मारली आहे. टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत भारताचा वेस्ट इंडिजने सात गडी राखून पराभव केला. या पराभवामुऴे भारताचे टी-२० वर्ल्डकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. आता अंतिम सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. या सामन्यात भारताने दिलेल्या २० षटकात १९२ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १९. ४ षटकात तीन बाद १९६ धावा केल्या. वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज जॉन्सन चार्ल्स आणि लेंडल सिमन्स यांनी शानदार खेळी केली. लेंडल सिमन्सने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ५३ चेंडूत पाच षटकार आणि सात चौकारांची खेळी करत नाबाद ८३ धावा केल्या, तर जॉन्सन चार्ल्सने ३६ चेंडूत दोन षटकारांसह सात चौकार लगावत ५२ धावा केल्या. ख्रिस गेल हे वादळ या सामन्यात चालले नाही, ख्रिस गेलला गोलंदाज बुमराहने यार्करवर बाद केले. आंद्रे रस्सेलने ४३ आणि सॅम्युअल्सने ८ धावा केल्या.
आक्रमक फलंदाज विराट कोहलीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज समोर १९३ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र विराटची ही खेळी अयशस्वी ठरली. भारताकडून भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ गड्याच्या मोबदल्यात १९२ धावा केल्या. विराटने ४७ चेंडूत एक षटकार आणि ११ चौकाराच्या मदतीने नाबाद ८९ धावा केल्या. त्याला रहाणे (४०) आणि धोनीने (१५) चांगली साथ दिली. तर गोलंदाज आशिष नेहरा, बुमराह आणि विराटने प्रत्येकी एक बळी टिपले.