शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वॉटसनला साडेनऊ, नेगीला साडेआठ कोटी!

By admin | Updated: February 7, 2016 03:28 IST

आॅस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन सर्वांत महागडा खेळाडू ठरला. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने तब्बल साडेनऊ कोटीत तर पवन नेगी या नवख्या खेळाडूला तब्बल साडेआठ

बेंगळुरू : आॅस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन सर्वांत महागडा खेळाडू ठरला. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने तब्बल साडेनऊ कोटीत तर पवन नेगी या नवख्या खेळाडूला तब्बल साडेआठ कोटी रुपये खचूर्न दिल्ली डेअरडेव्हिल्सने खरेदी केले. युवराजसिंगला सनराइजर्स हैदराबादने सात कोटी देऊन विकत घेतले. आयपीएलच्या नवव्या सत्राचा लिलाव शनिवारी पार पडला.मागच्यावर्षी १६ कोटी रुपये मिळविणाऱ्या युवीची बेस प्राईज दोन कोटी होती. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात युवीला आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धा लागली पण सनराइजर्सने त्याला बोली लावून खरेदी केले. अनुभवी गोलंदाज आशिष नेहरा याला साडेपाच कोटीत सनराइजर्सने आणि ईशांत शर्मा याला पुणे जायन्टस्ने ३.८ कोटीत खरेदी केले. केव्हिन पीटरसन याला देखील पुणे संघाने साडेतीन कोटी व गुजरात लॉयन्सने ड्वेन स्मिथला २.३ कोटीत खरेदी केले. वेस्ट इंडिजचा फलंदाज कार्लोस ब्रेथवेट याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने ४.२ कोटीत स्वत:कडे घेतले. त्याची बेस प्राईज फक्त ३० लाख होती. भारताचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याला किंग्स इलेव्हन पंजाबने साडेसहा कोटीची बोली लावून खरेदी केले. युवा यष्टिरक्षक- फलंदाज संजू सॅमसन हा ४.२ कोटीत दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या तंबूत गेला. मिशेल मार्श याला पुणे संघाने ४.८ कोटीत, मागच्या वर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून १२ कोटी घेणाऱ्या दिनेश कार्तिकला गुजरात लॉयन्सने २.३ कोटीत, डेल स्टेन आणि ड्वेन स्मिथ यांना देखील याच किमतीत खरेदी केले. मुंबई इंडियन्सने जोस बटलर याला ३.८ कोटीत आणि टिम साऊदीला २.५ कोटीत खरेदी केले. प्रवीण कुमारला गुजरातने ३.५ कोटी, धवल कुलकर्णी याला दोन कोटी आणि इरफान पठाणला एक कोटीत खरेदी केले. द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज काइल एबोट याला किंग्ज पंजाबने २़.१० कोटीत, अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने दोन कोटीत तर बरिंदर सरन याला सनराइजर्सने १.२ कोटीत खरेदी केले.लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सची मालकिण नीता अंबानी, किंग्स इलेव्हन पंजाबची मालकिण प्रिती झिंटा, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे मालक विजय माल्या, माजी खेळाडू रिकी पाँटिंग, स्टीफन फ्लेमिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण, टॉम मूडी, ब्रॅड हॉग, आणि डॅनियल व्हेट्टोरी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात मार्की खेळाडू विकले गेल्यानंतर लिलाव थंड वाटला. अनेक खेळाडूंवर बोली लागलीच नाही. आॅस्ट्रेलिया टी-२० संघाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच, न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज मार्टिन गुप्तिल,आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली, द. आफ्रिकेचा हाशिम अमला, निवृत्त झालेला माहेला जयवर्धने, मायकेल हसी आणि ब्रॅड हॅडिन यांच्याकडे फ्रॅन्चायसींनी दुर्लक्ष केले. विंडीजचा डेरेन सॅमी, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, आॅस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा, डेव्हिड हसी, अ‍ॅडम व्होजेस, भारताचा मुनाफ पटेल, यांच्यावरही बोली लागली नाही. लिलाव पूर्ण झाल्यानंतर या खेळाडूंना पुन्हा एक संधी मिळणार आहे.(वृत्तसंस्था)भाव न मिळालेले खेळाडूअ‍ॅरोच फिंच, मार्टिन गुप्तिल, जॉर्ज बेली,हाशिम अमला, माहेला जयवर्धने, मायकेल हसी, अक्षय व जितेशला संधीविदर्भ रणजी संघाचे दोन खेळाडू अक्षय कर्णेवार आणि जितेश शर्मा यांना आयपीएलमध्ये संधी मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने अक्षय कर्णेवाराला तर मुंबई इंडियन्सने जितेश शर्माला प्रत्येकी १० लाख रुपयांना करारबद्ध केले. वॉटसन रॉयल चॅलेंजर्स ९.५ कोटीनेगी दिल्ली डेअरडेव्हिल्स ८.५ कोटी युवराज हैदराबाद ७ कोटीमॉरिस दिल्ली डेअरडेव्हिल्स ७ कोटीमोहित शर्मा पंजाब ६.५ कोटीनेहरा हैदराबाद ५.५० कोटीमार्श पुणे सुपर जायन्टस् ४.८ कोटीसॅमसन डेअरडेव्हिल्स ४.२ कोटीकरुण नायर डेअरडेव्हिल्स ४ कोटी बटलर मुंबई इंडियन्स ३.८ कोटीईशांत पुणे जायन्टस् ३.५कोटीपीटरसन पुणे जायन्टस् ३.५ कोटीप्रवीण कुमार गुजरात ३.५ कोटीसाऊदी मुंबई इंडियन्स २.५ कोटीड्वेन स्मिथ हैदराबाद २.३ कोटीडेल स्टेन हैदराबाद २.३ कोटीदिनेश कार्तिक गुजरात २.३ कोटीधवल कुलकर्णी गुजरात २ कोटी स्टुअर्ट बिन्नी रॉयल चॅलेंजर्स २ कोटीहेस्टिंग्ज नाईट रायडर्स १.३ कोटीइरफान पठाण पुणे जायन्टस् १ कोटीकॉलिन मुन्रो नाईट रायडर्स ३० लाखमहागडे खेळाडूशेन वॉटसनआरसीबी९.५पवन नेगी डीडी८.५युवराजसिंग एसआरएच ७.००ख्रिस्टोफर मॉरिस डीडी ७.००मोहित शर्मा किंग्स पंजाब ६.५आशिष नेहरा ६.५ एसआरएचमिशेल मार्श ४.८ आरपीएसमुरगन अश्विन ४.५ आरपीएस