शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉलिबॉल

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

राज्य व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी डांगरे यांची निवड

राज्य व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी डांगरे यांची निवड
नागपूर : नागपूर जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष व भारतीय व्हॉलिबॉल महासंघाचे उपाध्यक्ष विजय डांगरे यांची सलग चौथ्यांदा महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नागपूर जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव सुनील हांडे यांची राज्य संघटनेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाली असून सचिवपदी कोल्हापूरचे बाळासाहेब सूर्यवंशी यांना कायम ठेवण्यात आले आहे.
आमदार निवास येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेच्या आमसभेमध्ये २०१५-१९ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्रातील ३५ जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. राज्य व्हॉलिबॉल संघटनेच्या बैठकीत निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. विवेक केदार यांनी काम पाहिले. याप्रसंगी भारतीय व्हॉलिबॉल महासंघाचे सहसचिव कमलेशकुमार काला आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे निरीक्षक नामदेव शिरगावकर उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)
महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे नवनिर्वाचित कार्यकारिणी
अध्यक्ष : विजय डांगरे (नागपूर), उपाध्यक्ष : सी.पी. गुप्ता (गोंदिया), रवीकिरण रेडीज (रत्नागिरी), रतन लिगाडे (धुळे), रवींद्र कांबळे (मुंबई उपनगर), मनीष जोशी ( अमरावती), श्रीनिवास सातुरकर (नांदेड), सुनील साखळे (वर्धा), संदीप पाटील (सांगली). सचिव : बाळासाहेब सूर्यवंशी (कोल्हापूर). कोषाध्यक्ष : सुनील हांडे (नागपूर). सहसचिव : सतीश पोवार (गडचिरोली). लातूर झोन सचिव : मंथन अप्पा पेलणे (उस्मानाबाद), नाशिक झोन सचिव : बी.पी. निकुंभ (नंदूरबार), औरंगाबाद झोन सचिव : अर्शद काझी (जालना), अमरावती झोन सचिव : दिलीप देशमुख (बुलडाणा), नागपूर झोन सचिव : गजानन जीवतोडे (चंद्रपूर), कोल्हापूर झोन सचिव : नीलेश जामनकर (सिंधुदुर्ग), पुणे झोन सचिव : पार्थ जोशी (पुणे).