शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

धोनीचा हा रेकॉर्ड तोडणे विराटला अशक्य

By admin | Updated: February 28, 2017 12:43 IST

कॅप्टन कूल धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे विराट कोहलीकडे सोपवण्यात आले.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 28 - कॅप्टन कूल धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे विराट कोहलीकडे सोपवण्यात आले. आक्रमक स्वभावाच्या विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर कोहलीने सातत्याने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याचप्रमाणे आपल्या सहकारी खेळाडूना ही त्याने प्रोत्साहन देत आपला विजयरथ कायम ठेवला. ऑस्ट्रेलियाविरोधात पुणे कसोटीत विरोटसेनेला 333 धावांनी पराभव स्विकारावा लागला, त्यापुर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 19 कसोटी सामन्यात 17 विजय आणि 2 ड्रॉ राखत अपारिजित राहिला होता. येणाऱ्या काळात विराट भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार होईल पण धोनीच्या कसोटी कर्णधार असातानाच्या विक्रमाची बरोबरी करु शकणार नाही. पुणे कसोटीतील पराभवानंतर विराटच्या हातून तो चान्स गेला आहे. धोनीने 2008 मध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सुत्रे आपल्या हाती घेतली, त्यानंतर कर्णधारपद सोडेपर्यंत त्याने भारतीय मैदानावर एकदाही ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजय मिळवून दिला नव्हता. भारतीय मैदानावर ऑस्ट्रेलियाविरोधात धोनी अपराजित आहे. हा आगळा-वेगळा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. 2008-9 आणि 2010-11 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात भारताने 2-0 आणि 2012-13मध्ये 4-0 ने विजय मिळवला होता. धोनीने ऑस्ट्रेलियाविरोधात भारतामध्ये 8 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.

(भारताच्या या फिरकीपटूमुळे विराटसेनेनं गमावली पुणे कसोटी)

पुण्यात खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटसेनेला 333 धावांच्या माणहाणीकारक पराभवाला सामोरे जावं लागले आहे. ऑस्ट्रेलियचा लेग स्पिनगर स्टीव ओ कीफे ने सामन्यात 12 भारतीय फलंदाजाला बाद करत विजयात मोठा वाटा उचलला. पुणे कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात 105 तर दुसऱ्या डावात 107 धावांवर गारद झाला. चार कसोटी सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने 1-0ने आघाडीवर आहे. दुसरा सामना चार मार्च रोजी सुरु होणार.

(सचिन, कोहलीला जमलं नाही ते महिला क्रिकेटरने केलं)