शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

मिताली राजला शुभेच्छा देताना विराट कोहलीची झाली "गोची"

By admin | Published: July 13, 2017 6:34 AM

फेसबुकवर मितालीला शुभेच्छा देताना विराटने मोठी चूक केली.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि.13 - भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने काल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. 8 विकेटने हा सामना भारताने गमावला असला तरी महिला क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा ओलांडणा-या मितालीवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी मितालीला शुभेच्छा दिल्या. अन्य दिग्गज मंडळीप्रमाणे न्यूयॉर्कमध्ये गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत सुट्टी एन्जॉय करत असलेल्या भारतीय पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही मितालीला ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पण फेसबुकवर मितालीला शुभेच्छा देताना विराटने मोठी चूक केली. आपल्या पोस्टमध्ये त्याने शुभेच्छा तर मितालीलाच दिल्या पण त्यासोबत फोटो शेअर करताना त्याची भलतीच फसगत झाली. मितालीऐवजी त्याने कालच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या मराठमोळ्या पूनम राऊतचा फोटो शेअर केला.

भारतीय महिला ‘टॉप’वर

मिताली राजने धावांचा एव्हरेस्ट पार केला, तर गोलंदाजी क्षेत्रात अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज आहे. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. झुलन गोस्वामीच्या नावावर १८९ बळी आहे. तिने नुकताच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आॅस्ट्रेलियाच्या कॅथरीन फिट्सपॅट्रिक हिचा १८० बळींचा विक्रम मोडला. योगायोग म्हणजे, पुरुष क्रिकेटमध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्यामुळे क्रिकेटवरील भारतीय वर्चस्व स्पष्ट होते. ९ अर्धशतके एकाच वर्षात. गेल्या वर्षी इलीज पेरी हिने ९ अर्धशतके ठोकली होती. मितालीने या वर्षी १२ डावांत ७७.६२ च्या सरासरीने ६२१ धावा केल्या. ५ नाबाद शतकांचा समावेश. दहापैकी ९ सर्वाेच्च खेळींत तिने नाबाद खेळी केली.११४ धावांची पदार्पणात खेळी. आयर्लंडविरुद्ध १९९९ मध्ये ही कामगिरी. महिला क्रिकेटमध्ये पाच फलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. पदार्पणात मितालीची तिसऱ्या क्रमांकाची सर्वाेच्च खेळी होती.१६ वर्षे २०५ दिवस एवढे वय असताना मितालीने महिला एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकाविले. ती सर्वांत तरुण फलंदाजी ठरली.१७ वर्षांखालील कोणत्याही महिला फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

>भारतीय क्रिकेटसाठी मोठा क्षण आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत जास्त धावा केल्या. अभिनंदन..

- विराट कोहली

सर्वोत्तम बातमी, मिताली राज ही सर्वांत जास्त धावा करणारी खेळाडू बनली. अभिनंदन

- अनिल कुंबळे

मिताली राज ही सर्वांत जास्त धावा करणारी खेळाडू, सर्वोत्तम यश.

- अजिंक्य रहाणे

सर्वोत्तम यश, मिताली राज ही ६ हजार धावा करणारी पहिली महिला खेळाडू बनली; तसेच सर्वांत जास्त धावा करणारी खेळाडू बनली, दोन्ही विक्रम तिच्याच नावे.

- लिसा स्थळेकर

मिताली राज हिच्या खेळात होत असलेली प्रगती तिच्या वयाच्या दहाव्या वर्षांपासून पाहत आहे. तिने आता सहा हजार धावा केल्या, अभिनंदन मिताली राज

- व्ही.व्ही.एस. लक्ष्मण

अभिनंदन मिताली राज, महिला क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त धावा करण्याचा मान तू पटकावला. हे मोठे यश आहे. आजची खेळी सर्वोत्तम होती.

- सचिन तेंडुलकर

अभिनंदन मिताली राज, उल्लेखनीय पराक्रम, महिलाशक्ती.

- हरभजन सिंह

 

अभिनंदन मिताली राज, आम्हाला तुझा अभिमान आहे.

-शिखर धवन

अभिनंदन भारतीय रनमशिन, महिला क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त

धावा, टू चॅम्पियन. - गौतम गंभीर