विराट गोवा संघाचा अ‍ॅम्बेसेडर?

By Admin | Updated: August 4, 2014 02:55 IST2014-08-04T02:55:01+5:302014-08-04T02:55:01+5:30

इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) केरला ब्लास्टरकडे सचिन तेंडुलकर, मुंबईकडे रनवीर कपूर, पुण्याकडे सलमान खान, कोलकाताकडे सौरभ गांगुली, तर गुवाहाटीकडे जॉन अब्राहम

Virat ambassador of Goa team? | विराट गोवा संघाचा अ‍ॅम्बेसेडर?

विराट गोवा संघाचा अ‍ॅम्बेसेडर?

गोवा : इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) केरला ब्लास्टरकडे सचिन तेंडुलकर, मुंबईकडे रनवीर कपूर, पुण्याकडे सलमान खान, कोलकाताकडे सौरभ गांगुली, तर गुवाहाटीकडे जॉन अब्राहमअसे नावाजलेले आणि चर्चेतील चेहरे अ‍ॅम्बेसेडर म्हणून आहेत.
मग या शर्यतीत गोवा संघानेही मागे न राहण्याचा निर्धार केला असून, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विराट कोहली याच्याकडे
त्यांची चर्चा सुरू असल्याचे समजते.
एकूण ८ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत श्रीनिवास डेंम्पो, दत्तराज सालगावकर आणि विडीओकॉन यांनी गोवा संघ विकत घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गोवा संघाचे मार्केटिंग विभागाचे प्रमुख राहुल रायचंद हे गेल्या काही आठवड्यांपासून विराट कोहलीशी चर्चा करीत असल्याचे समजते. कोहली हा भारतीय क्रिकेटमधील स्टार खेळाडू आहे आणि यूके मॅकझीनने नुकत्याच जाहीर केलेल्या मार्केटमध्ये सर्वांत जास्त पसंती असलेल्या खेळाडूंच्या यादीत ब्रिटिश फॉर्म्युला वन चालक लुईस हॅमिल्टन याच्यानंतर विराटचाच नंबर येतो. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) क्रिकेटर आॅफ दी इयर - २०१२करिता त्याच्या नावाची घोषणा केली होती. गोवा संघ आणि कोहली यांच्यात अद्याप करार झालेला नाही. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होईल, असेही समजते.

Web Title: Virat ambassador of Goa team?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.