विराटने वाढविला भारतीय अॅथलिट्सचा उत्साह
By Admin | Updated: August 7, 2016 21:19 IST2016-08-07T21:19:32+5:302016-08-07T21:19:54+5:30
कोहलीने रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या भारतीय अॅथलिट्सचा उत्साह वाढविण्यासाठी एक व्हीडीओ पोस्ट केलेला आहे.

विराटने वाढविला भारतीय अॅथलिट्सचा उत्साह
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7- टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळत असलेल्या भारतीय अॅथलिट्सचा उत्साह वाढविण्यासाठी एक व्हीडीओ पोस्ट केलेला आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतचे आपले सर्वात मोठे ११८ सदस्यांचे पथक पाठविले आहे़ या खेळाडूंकडून देशवासियांना पदकांच्या खूप अपेक्षा आहेत़ विराटनेदेखील याच अपेक्षेसह भारतीय पथकाचा उत्साह वाढविला आहे आणि त्याने चांगल्या कामगिरीची अपेक्षाही व्यक्त केली आहे़ व्हीडीओमध्ये विराट असे सांगताना दिसून येत आहे की, ज्या देशामध्ये क्रिकेटने कोट्यवधी लोकांच्या मनामध्ये घर केले आहे त्यामध्ये काही असेही खेळाडू आहेत की ज्यांची इच्छाशक्ती खूपच प्रबळ आहे.