VIDEO: विरोधी संघानाही चकित करणारे धोनीचे 5 रनआऊट
By Admin | Updated: October 28, 2016 17:48 IST2016-10-28T17:48:01+5:302016-10-28T17:48:01+5:30
टीम इंडियाचा वन डे आणि टी 20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वेळोवेळी आपल्या फलंदाजी सोबतंच अफलातून विकेटकिपिंगच्या वेगळ्या स्टाईलने सगळ्यांनाच चकीत केलं

VIDEO: विरोधी संघानाही चकित करणारे धोनीचे 5 रनआऊट
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - टीम इंडियाचा वन डे आणि टी 20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वेळोवेळी आपल्या फलंदाजी सोबतंच अफलातून विकेटकिपिंगच्या वेगळ्या स्टाईलने सगळ्यांनाच चकीत केलं आहे. म्हणून तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 151 स्टम्पिंग करणारा तो पहिला विकेटकिपर बनला असून त्याच्या या विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही. कारण सर्वाधिक स्टम्पिंग करणाऱ्या पाच विकेटकिपरच्या यादीत, धोनी एकटाच सध्या क्रिकेट खेळतो, उर्वरित चारही जणांनी निवृत्ती घेतली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यातही रॉस टेलरला रनआऊट करताना त्याने अशी काही करामत केली की सर्वत्र धोनीच्या विकेटकिपिंगची चर्चा पुन्हा सुरू झाली.
त्यानिमित्ताने पाहुया धोनीने केलेले 5 अफलातून रनआऊट ज्यामुळे विरोधीसंघ देखील चकित झाले.