VIDEO : सामन्यात क्रिकेटपटूचा पाय निखळला, तरी तो खेळला
By Admin | Updated: October 31, 2016 16:24 IST2016-10-31T16:14:47+5:302016-10-31T16:24:15+5:30
शारीरिकदृष्ट्या अक्षम क्रिकेटपटूंच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना एका खेळाडूचा कृत्रीम पाय निखळला. रविवारी दुबईमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान संघादरम्यान आयसीसीने आयोजित

VIDEO : सामन्यात क्रिकेटपटूचा पाय निखळला, तरी तो खेळला
ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 31- शारीरिकदृष्ट्या अक्षम क्रिकेटपटूंच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना एका खेळाडूचा कृत्रिम पाय निखळला. रविवारी दुबईमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान संघादरम्यान आयसीसीने आयोजीत केलेल्या इन्विटेशनल टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे.
इंग्लंडचा खेळाडू लियाम थॉमससोबत ही घटना घडली. पाकिस्तानच्या खेळाडूने मारलेला चेंडू अडवताना लियाम वेगाने धावत गेला मात्र, त्याचवेळी त्याचा कृत्रिम डावा पाय निखळला. आश्चर्य म्हणजे तरीही लियामने तो चेंडू अडवला आणि क्षणाचाही विलंब न करता पडलेला कृत्रिम पाय लावून त्याने पुन्हा क्षेत्ररक्षणाला सुरूवात केली. या घटनेबाबत थॉमस म्हणाला, ही घटना अचानक घडली, मी पडल्यावर उठलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा कृत्रीम पाय पडला आङे. त्यावेळी चेंडू उचलावा की पाय तेच मला समजत नव्हतं मात्र मी चेंडू फेकायचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर विजय मिळवला.