शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उज्बेकच्या खेळाडूने केला ग्रँडमास्टर वैशालीचा अपमान; तिने त्याला धूळ चारून घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:40 IST

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात याकुबोएव विरुद्ध चौथ्या फेरीच्या खेळाच्या सुरुवातीपूर्वी वैशाली हात पुढे करताना दिसत आहे.

उज्बेकिस्तानच्या ग्रँडमास्टर याकुबोएव याने भारताची महिला ग्रँडमास्टर वैशालीसोबत हस्तांदोलन न केल्याने वाद निर्माण झाला आहे. याच याकुबोएवने गेल्यावर्षीच्या स्पर्धेत भारताच्या दिप्तीसोबत मात्र हात मिळविला होता. वैशालीने हा अपमान गिळला त्याला पराभूत करून घडल्या प्रकाराचा बदला घेतला आहे. आता वाद झाल्यावर याकुबोएवने परस्त्रीला स्पर्श करणे हा इस्लाम धर्माचा अपमान असल्याचे कारण सांगितले आहे. परंतू, याच महाशयाने गेल्यावर्षी एका परस्त्रीशी हस्तांदोलन केले होते, हे मात्र तो सपशेल विसरला आहे.  टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात याकुबोएव विरुद्ध चौथ्या फेरीच्या खेळाच्या सुरुवातीपूर्वी वैशाली हात पुढे करताना दिसत आहे. परंतू याकुबोएवने तिला हात दिला नाही, कोणतिही प्रतिक्रिया न देता तो खाली बसला. यामुळे वैशाली काहीशी अस्वस्थ झाली.परंतू, तिने हा अपमान सावरत खेळ सुरु केला व ०१९ मध्ये ग्रँडमास्टर बनलेल्या याकुबोएवला पराभवाची धूळ चारली. चेसबेसने याचा प्रसंगाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

या याकुबोएवचा पराभव केल्यानंतर वैशालीने हँडशेक करण्यासाठी हात पुढे केला नाही. आठ फेऱ्यांनंतर वैशालीचे चार गुण आहेत. स्पर्धेत अजून पाच फेऱ्या खेळायच्या आहेत. तर याकुबोएवचे तीन गुण झाले आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याकुबोएवने त्याच्या एक्स-अकाउंटवर पोस्ट करून माफी मागितली. वैशाली आणि तिचा धाकटा भाऊ आर प्रज्ञानंद यांचा आदर करतो, परंतु धार्मिक कारणांमुळे मी दुसऱ्या महिलेला स्पर्श करू शकत नाही.महिला आणि भारतीय बुद्धिबळपटूंबद्दल आदराने मी सर्वांना कळवू इच्छितो की मी धार्मिक कारणांसाठी इतर महिलांना स्पर्श करत नाही. भारतातील सर्वात बलवान बुद्धिबळपटू म्हणून मी वैशाली आणि तिचा भाऊ यांचा आदर करतो. जर माझ्या वागण्याने त्यांना दुखावले असेल तर मी माफी मागतो, असे त्याने म्हटले आहे. 

टॅग्स :Chessबुद्धीबळ