शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारताची ग्रँडमास्टर आर. वैशालीनं शह दिलेला तो चेहरा अन् या दोघांमधील कमालीचा योगायोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:51 IST

इथं जाणून घेऊयात दोन्ही ग्रँडमास्टरसंदर्भातील कमालीच्या योगायोगासंदर्भातील गोष्ट

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर वैशाली आणि उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर नोदिर्बेक याकुब्बेवा यांच्यात सामन्याआधी पाहायला मिळालेला सीन सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. तो आला तिनं त्याला पाहिलं अन् खिलाडूवृत्ती दाखवत सामन्याआधी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. पण त्यानं हस्तांदोलन करण्यास नकार दिला अन् खेळ सुरु करण्यासाठी आपल्या जागेवर बसला. शेवटी भारताची ग्रँडमास्टर आर वैशालीनं या लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडूला शह  दिला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

व्हिडिओ व्हायरल झाला अन् मग परदेशी गँडमास्टरनं मागितली माफी पण खेळ सुरु होण्याआधी घडलेल्या काही सेकंदाचा सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. उझबेकिस्तानच्या खेळाडूनं भारतीय खेळाडूचा अपमान केल्याची चर्चा रंगू लागली. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या परदेशी खेळाडूनं माफी मागितली. एवढेच नाही तर धार्मिक भावना जपत असल्यामुळे महिलांना स्पर्श करत नाही, असे  कारणही त्याने सांगितले आहे. इथं जाणून घेऊयात दोन्ही ग्रँडमास्टरसंदर्भातील कमालीच्या योगायोगासंदर्भातील गोष्ट

ज्यानं भारतीय महिला खेळाडूला हस्तांदोन करण्यास नकार दिला त्याची बहिणही चेस प्लेयर

२३ जानेवारी २००२ मध्ये जन्मलेल्या २३ वर्षीय नोदिर्बेक याकुब्बेवा या बुद्धिबळपट्टूनं २०१९ मध्ये ग्रँडमास्टरची उपाधी मिळवलीये. जानेवारीच्या फिडे रँकिंगमध्ये तो २६५९ स्थानावर आहे. या बुद्धिबळपटूची मोठी बहिण निलुफर मुराडोव्हना याकुब्बेवा ही देखील एक लोकप्रिय आणि यशस्वी बुद्धिबळपटू आहे. २०१९ ते २०२१ सलग तीन वर्षे युझबेकिस्तान चेस चॅम्पियन्शिप स्पर्धा जिंकणाऱ्या निलुफर हिने २०२० मध्ये  वुमन इंटरनॅशनल मास्टर अन् २०२२ मध्ये वुमन ग्रँडमास्टर ही उपाधी मिळवलीये. 

प्रतिस्पर्धी खेळाडूप्रमाणेच खास आहे आर वैशालीची स्टोरी

आता कमालीचा योगोयाग हा की, उझबेकिस्तानच्या त्या प्रतिस्पर्धी प्रमाणेच २३ वर्षीय आर. वैशालीचा भाऊही बुद्धिबळ क्रीडा प्रकारातील प्रतिभावंत चेहरा आहे. ते नाव दुसरं तिसरं कोणी नसून ते आहे आर.  प्रज्ञानंद. फरक फक्त एवढाच की, भारताच्या पहिल्या वहिल्या ग्रँडमास्टर बहिण भावाच्या जोडीत बहिण थोरली अन् भाऊ धाकटा आहे.

टॅग्स :Chessबुद्धीबळR Praggnanandhaaआर प्रज्ञाननंदा