शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

US Open 2024: गोल्डन कामगिरीनंतर जोकोव्हिचला खुणावतोय ग्रँडस्लॅममधील मोठा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 12:45 IST

नव्या जोमानं खेळत उतार वयात आणखी एक नवं शिखर गाठण्याच्या इराद्यानेच तो कोर्टवर उतरेल

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण क्षण अनुभवल्यानंतर नोव्हाक जोकोव्हिचला आता ग्रँडस्लॅम स्पर्धेत नवा विक्रम खुणावतो आहे. सोमवारपासून सुरु होणाऱ्या अमेरिकन ओपन स्पर्धेत तो आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी उत्सुक आहे. नव्या जोमानं खेळत उतार वयात आणखी एक नवं शिखर गाठण्याच्या इराद्यानेच तो कोर्टवर उतरणार आहे.   

५ व्या जेतेपदासह २५ व्या ग्रँडस्लॅमला गवसणी घालण्याची संधी

यंदाच्या अमेरिकन ओपन स्पर्धेत पाचव्यांदा जेतेपद पटकावल्यास जोकोव्हिच जिमी कॉनर्स, पीट सॅम्प्रास आणि रॉजर फेडरर यांची बरोबरी करत या स्पर्धेतील वयोवृद्ध चॅम्पियन होण्याचा विक्रम नोंदवण्याची त्याच्याकडे संधी आहे. एवढेच नाही या जेतेपदासह 25 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावे होईल. सध्याच्या घडीला महिला आणि पुरुष गटात एकत्रितपणे मार्गारेट कोर्टसह २४ ग्रँडस्लॅमसह तो संयुक्तरित्या अव्वलस्थानावर आहे.

युवा पोरांनी दिलेल्या कडव्या आव्हानाचा करावा लागला सामना 

हे वर्ष जोकोव्हिचसाठी आव्हानात्मक राहिले आहे. वर्षाच्या सुरुवातीला अवघ्या २३ वर्षांच्या युवा इटालियन जॅनिक सिन्नर याने  ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा गाजवत जोकोव्हिचचा नंबर वनचा ताज हिरावून घेतला. त्यानंतर फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपन स्पर्धेत कार्लोस अल्काराझनं आपली जादू दाखवली.

जगातील मानाच्या स्पर्धेतून कमबॅक

पण हे सगळं घडल्यावर हार मानेल तो जोकोव्हिच कसला. जोकोव्हिचनं ऑलिम्पिक स्पर्धेत अल्काराझला धक्का देत जबरदस्त कमबॅक करून दाखवलं. करिअर गोल्डन स्लॅमचं रिंगण पूर्ण केल्यावर आता पुन्हा तो नव्या टार्गेटसह नवं ध्येय सेट करून कोर्टवर उतरण्यास सज्ज आहे. एका बाजूला सिन्नरसारखा युवा टेनिस स्टारला डोपिंगसंदर्भातील गोष्टीमुळे चर्चेच्या गर्तेत आहे. दुसरीकडे ३७ व्या वर्षीही जोकोव्हिच नवा रेकॉर्डच्या दिशेनं पाऊल टाकताना दिसतोय. ही गोष्ट या टेनिस स्टारला सर्वांपेक्षा वेगळं ठरवते. पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पाडते. ऑलिम्पिकमधील सुवर्ण कामगिरीनंतर वर्षाचा शेवट तो नव्या विक्रमासह करेल, हीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा असेल.

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिस