शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

Serena Williams Retirement: महिला टेनिस विश्वातील झंझावात आज थांबला? 'टेनिस सम्राज्ञी' सेरेना विल्यम्सची निवृत्तीची घोषणा! पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 10:41 AM

कुरळे केस...धाकड शरीरयष्टी...फोरहँड, बॅकहँडमध्ये कमालीची ताकद आणि दुर्देम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आजवर तब्बल २३ ग्रँडस्लॅम नावावर करणाऱ्या सेनेना विल्यम्सचा झंझावात अखेर आज थांबला.

Serena Williams Retirement: महिला टेनिस विश्व जिच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कुरळे केस...धाकड शरीरयष्टी...फोरहँड, बॅकहँडमध्ये कमालीची ताकद आणि दुर्देम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आजवर तब्बल २३ ग्रँडस्लॅम नावावर करणाऱ्या सेनेना विल्यम्सचा झंझावात अखेर आज थांबला. अमेरिकन ओपनच्या तिसऱ्या फेरीत आज सेरेनाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यंदाची अमेरिकन ओपन स्पर्धा आपल्या करिअरची शेवटची स्पर्धा असणार असल्याचं सेनेनानं याआधीच जाहीर केलं होतं. सेरेनाचा आज ऑस्ट्रेलियाच्या अजला टॉम्लजानोविक विरुद्धच्या सामन्यात 7-5, 6-7, 6-1 असा पराभव झाला. या पराभवानंतर सेनेनाचा तिच्या करिअरमधला शेवटचा सामना ठरला असल्याचं बोललं जात आहे. 

सेरेनानं आजचा सामना गमावला असला तरी कोर्टवर आज तिच्याच नावाचा जल्लोष होत होता. सेरेनानंही सर्वांचं अभिवादन स्वीकारलं आणि आजवर दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. आता आईचं कर्तव्य पार पाडण्याची वेळ आली आहे, असं म्हणत तिनं आपलं उर्वरित आयुष्य आता मुलीकडे लक्ष देणार असल्याचं सुतोवाच केलं. विशेष म्हणजे आपल्या आईचा शेवटचा सामना पाहण्यासाठी सेरेनाची चिमुकली देखील कोर्टवर उपस्थित होती. तसंच आई आणि लेकीनं मॅचिंग कपडे परिधान केले होते. 

सोशल मीडियातही सेरेनावर दिग्गजांकडून अभिनंदनाचे आणि आभाराच्या पोस्ट केल्या जात आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनीही ट्विट करत सेरेनाचे आभार व्यक्त केले आहेत. मिशेल यांनी सेरेनाचा आजच्या सामन्याचा व्हिडिओ ट्विट करत तिच्या आजवरच्या प्रवासाचा उल्लेख करत कौतुक केलं आहे. आम्हाला तुझा अभिमान आहे. तुझी प्रेरणा घेऊन अनेक युवा टेनिसपटू घडतील याची खात्री आम्हाला आहे, असं मिशेल ओबामा यांनी म्हटलं आहे. 

सेरेनाचे पुनरागमनाचेही संकेतलक्षवेधी बाब अशी की अमेरिकन ओपनच्या आधी ही आपली शेवटची स्पर्धा असणार असल्याचं सेरेनानं जाहीर केलं होतं. पण आजच्या सामन्यातली पराभवानंतर बोलताना तिनं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. सेरेनाला जेव्हा पुनरागमनाचा विचार आहे का असं विचारलं तेव्हा तिनं एक महत्वाचं विधान केलं. "भविष्यात काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. पण सध्या मी एका आईचं कर्तव्य पूर्ण करण्यास प्राधान्य देणार आहे. मला माझं आयुष्य जगायचं आहे", असं सेरेना म्हणाली. ऑस्ट्रेलियात खेळणं खूप आनंददायी असतं, असं म्हणत सेरेनानं सूतोवाच केलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेरेना दिसण्याचीही शक्यता आहे.

यशाचे श्रेय बहीणीलासेरेनाने तिची बहीण व्हीनस विल्यम्सचं कौतुक केलं. व्हीनस नसती तर सेरेना कधीच टेनिस खेळू शकली नसती, असं ती म्हणाली. सेरेनानं 2015 सालचं फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावणं ही तिची सर्वात मोठी कमाई असल्याचं सांगितलं. सेरेना तेव्हा फायनलपूर्वी खूप आजारी होती आणि न खेळण्याचा विचार करत होती. आजारी असतानाही तिनं अंतिम फेरीत खेळण्याचा निर्णय घेतला आणि लुसी सफारोव्हाचा 6-3, 6-7, 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावलं होतं.

यूएस ओपनमध्येच पहिले ग्रँडस्लॅम जिंकलं२३ वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेना विल्यम्सने १९९९ मध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती. हे तिच्या कारकिर्दीतील पहिलं ग्रँडस्लॅम ठरलं. त्यानंतर तिनं महिला दुहेरीत १४ ग्रँडस्लॅम आणि मिश्र दुहेरीत दोन ग्रँडस्लॅम जिंकले. त्याने चार वेळा ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. तिनं महिला एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारात राज्य केलं आणि पहिलं स्थान कायम राखलं. तिनं महिला एकेरीत एकूण ७३ विजेतेपद पटकावली आहेत.

सेरेनाची ग्रँड स्लॅम विजेतेपदं

  • ऑस्ट्रेलियन ओपन- २००३, २००५, २००७, २००९, २०१०, २०१५, २०१७
  • फ्रेंच ओपन- २००२, २०१३, २०१५
  • विम्बल्डन- २००२, २००३, २००९,२०१०, २०१२, २०१५, २०१६
  • यूएस ओपन- १९९९, २००२, २००८, २०१३, २०१४
टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्सTennisटेनिस