उरुग्वे बाद फेरीत

By Admin | Updated: June 25, 2014 02:19 IST2014-06-25T02:19:57+5:302014-06-25T02:19:57+5:30

विश्वचषकाचा पहिला ‘चॅम्पियन’ राहीलेल्या उरुग्वेने निर्णायक लढतीत दहा खेळाडूंसह खेळणा:या इटलीवर 1-0 ने विजय नोंदवून फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ‘ड’ गटात मंगळवारी बाद फेरीत प्रवेश केला.

Uruguay in the next round | उरुग्वे बाद फेरीत

उरुग्वे बाद फेरीत

>नटाल : विश्वचषकाचा पहिला ‘चॅम्पियन’ राहीलेल्या उरुग्वेने निर्णायक लढतीत दहा खेळाडूंसह खेळणा:या इटलीवर 1-0 ने विजय नोंदवून  फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ‘ड’ गटात मंगळवारी बाद फेरीत प्रवेश केला. याच गटातील इंग्लंड- कोस्टारिका हा सामना गोलशून्यने बरोबरीत राहीला. उरुग्वे आणि कोस्टारिका संघांनी क्रमश: सहा  आणि सात गुणांसह अंतिम 16 संघांमध्ये स्थान निश्चित केले तर इटली आणि इंग्लंडला मात्र घरचा रस्ता धरावा लागला. इटलीने तीन तर इंग्लंडने एका गुणाची कमाई केली.
चार वेळेचा विजेता इटलीविरुद्धच्या विजयात उरुग्वेचा कर्णधार आणि बचाव फळीतील भक्कम खेळाडू दिएगो गोडीन याने 81 व्या मिनिटाला नोंदविलेला गोल निर्णायक ठरला. त्याआधी मध्यांतरार्पयतच्या खेळात उभय संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले होते. इटलीला चार वर्षानंतर पुन्हा पहिल्याच फेरीतून बाहेर पडावे लागले. 
इटलिचा मिडफिल्डर क्लाऊडिया मार्किजोला धसमुसळा खेळ केल्याबद्दल रेड कार्ड दिल़े
स्टार स्ट्राईकर लुईज सुआरेजच्या शानदार कामगिरीवर या संघाला विश्वास होता. पण सुआरेजने प्रतिस्पर्धी खेळाडूला दाताने चावा घेताच खळबळ माजली. 8क् व्या मिनिटाला ही घटना घडली.  पुढच्या मिनिटाला कर्णधार गोडीनने कॉर्नरवर गोल केला. त्याचा शॉट गोलकिपर ङिायान लुईगी बुफोन याला चकवित थेट गोलजाळीत विसावला.
 उरुग्वेला कुठल्याही स्थितीत आज विजय हवा होता. दुसरीकडे इटलीने ही लढत अनिर्णीत राखली असती तर बाद फेरी गाठण्याची संधी इटलीला देखील मिळाली असती. पण विश्वचषकाचा 5क् वा सामना खेळणा:या उरुग्वेने कुठलीही जोखिम पत्करायची नाही या निर्धारासह खेळून अखेर विजय साकारला. (वृत्तसंस्था)
 
‘डी’ गट 
संघसामने विजय ड्रॉपराभव गो.  केलेगोल स्वी. गुण 
कोस्टा रिका321क्417
उरुग्वे 32क्1446
इटली31क्2233
इंग्लंड 3क्12241

Web Title: Uruguay in the next round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.