उरूग्वेला 'चावा' भोवला!
By Admin | Updated: June 29, 2014 04:02 IST2014-06-29T04:02:52+5:302014-06-29T04:02:52+5:30
कोलंबिया विरूध्द उरूग्वे यांच्यात झालेल्या सामन्यात कोलंबिया संघाने उरूग्वेवर २-० असा विजय मिळवित मोठया दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

उरूग्वेला 'चावा' भोवला!
>
कोलंबिया उपांत्यपूर्व फेरीत
ऑनलाइन टीम
रिओ दि जानिरो, दि. २९ - फिफा विश्चचषकात शनिवारी मध्यरात्री कोलंबिया विरूध्द उरूग्वे यांच्यात झालेल्या सामन्यात कोलंबिया संघाने उरूग्वेवर २-० असा विजय मिळवित मोठया दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता अंतीम आठमध्ये कोलंबियाचा सामना होईल तो बलाढय ब्राझील संघासोबत.
अनुभवी खेळाडू लुईस सुआरेझ याच्याशिवाय मैदानात उतरलेल्या उरूग्वे संघाला सुआरेझचा 'चावा' चांगलाच भोवला. कोलंबियाच्या जेम्स रॉड्रीग्झने सामन्याच्या २८ मिनिटाला पहिला गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ५० व्या मिनिटाला जेम्स रॉड्रीग्झने पुन्हा एकदा आपला करीष्मा दाखवत अफलातून गोल केला आणि संघाला २-० ने आघाडी मिळवून दिली. उरूग्वे संघात सुआरेझ हा अनुभवी खेळाडू होता पण त्याने इटलीच्या जॉर्जिओ चिलिनी या खेळाडूला चावा घेतल्याने त्याच्यावर ९ सामन्यांची बंदी आली आहे.