विश्वविद्यालय बॅडमिंटन ..
By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:21+5:302015-07-06T23:34:21+5:30
भारताचा स्वित्झर्लंडवर विजय

विश्वविद्यालय बॅडमिंटन ..
भ रताचा स्वित्झर्लंडवर विजयग्वांग्झू : दक्षिण कोरियातील ग्वांग्झू येथे आजपासून सुरू झालेल्या युनिवर्सिएड २०१५ बॅडमिंटन स्पर्धेत भारताने एका संघर्षपूर्ण लढतीत स्वित्झर्लंडला ४-१ नी हरविले. या विजयामुळे भारताने मिश्र सांघिक गटात आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.भारतीय संघ थायलंडकडून ०-५ने पराभूत झाल्यामुळे बॅकफूटवर गेला होता. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता.थॉमस हेनिगर आणि सान्या हर्जिग यांच्या जोडीने हेमा नागेंद्रबाबू आणि मेघना जकामपुदी जोडीला १२-२१, २१-१९, २१-१८ असे हरवून ग्रुप डीमध्ये स्वित्झर्लंडला चांगली सुरवात करून दिली. पुरुष एकेरीत श्रेयांश जैस्वालने ख्रिस्टीयन किर्चमायरला २१-१८, २१-९ असे हरवून भारताला बरोबरी मिळवून दिली. अर्जुनकुमार रेड्डी आणि नागेंद्रबाबू यांनी पुरुष दुहेरीत ख्रिस्टोफर हेनिगर आणि थॉमस हेनिगर यांना २३-२५, २१-१६, २१-१२ असे हरवून भारताला आघाडीवर नेले. यानंतर वैष्णवी भाले हिने अयेला हुसेरला २१-१४, २१-१४ असे हरवून भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कुकापाली माने आणि मेघना यांनी महिला दुहेरीत २१-१७, २१-१७ विजयासह ४-१ असा विजय निश्चित केला.सकाळच्या सत्रात यजमान कोरियाने युगांडाला ५-० असे हरविले. चीन आणि जपानने अनुक्रमे अमेरिका आणि फिलिपाईन्सला हरविले.०००