शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

एक राष्ट्र म्हणून ऑलिम्पिक पातळी गाठण्यासाठी, ऍथलेटिक फ्रेमवर्कमध्ये क्रीडा विज्ञान समाविष्ट करावे लागेल - अभिनव बिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 20:18 IST

क्रीडा विज्ञान हे खेळाडूंच्या विकासात व तंत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगताना ज्ञान आणि समज यांचे अनोखे भांडार असल्याचे सांगितले.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे भारतीय क्रीडा विज्ञान परिषदेला संबोधित करताना, देशातील  “नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स” येथे क्रीडा विज्ञानाच्या महत्त्वावर भर दिला. या परिषदेमध्ये भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, २००३ विश्व अजिंक्यपद कांस्यपदक विजेती अंजू बॉबी जॉर्ज आणि भारतीय क्रिकेटर दीपक चहर यांच्यासह अनेक आजी-माजी क्रीडापटू या परिषदेला उपस्थित होते.

या एक दिवशीय क्रीडा विज्ञान परिषदेचे आयोजन “ट्रान्सस्टेडिया विद्य्पीठ (ट्रान्सस्टेडिया एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनची शैक्षणिक शाखा), भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि राष्ट्रीय क्रीडा विज्ञान आणि संशोधन केंद्र (एनसीएसएसआर), युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सहकार्याने केले होते. यामध्ये एक व्यावसायिक भागीदार म्हणून “स्पोर्ट्सकॉम इंडस्ट्री कॉन्फेडरेशन” सहभागी झाले होते. या विज्ञान परिषदेचा भारतीय खेळ व खेळाडूंमध्ये उच्च दर्जाची कामगिरी करणे व खेळाचा दर्जा उंचावण्याचा महत्वाचा उद्देश होता. 

भारताला २०३६ चे ऑलिम्पिक डोळ्यासमोर ठेऊन आपली उद्दिष्टे व लक्ष यावर लक्ष केंद्रित करून भारताला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनवण्याचे ध्येय बाळगल्याचे अनुराग ठाकूर आणि या परिषदेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी क्रीडा विज्ञानाचे ज्ञान व त्याचा उपयोग आपल्या क्रीडा क्षेत्राला उभारी देण्याचे काम करू शकेल व हे आपल्या खेळाडूंची कामगिरी उंचावण्यात महत्वाची भूमिका बजावेल असे स्पष्ट केले.

या परिषदे दरम्यान “ट्रान्स्टेडिया आणि भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या पहिल्या भारतीय क्रीडा विज्ञान परिषदे २०२४ मध्ये सहभागी होताना आनंद होत असल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. अशा प्रकारची परिषद ट्रान्सटेडिया सारख्या संस्थेने पुढाकार घेऊन असे आयोजन करताना पाहून खूप आनंद होत असल्याचेही ते म्हणाले. 

क्रीडा विज्ञान हे खेळाडूंच्या विकासात व तंत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगताना ज्ञान आणि समज यांचे अनोखे भांडार असल्याचे सांगितले. क्रीडा विज्ञान आपल्या मुलांना त्यांच्या शारीरिक मर्यादा समजून घेण्यास मदत करते. हे त्यांना त्यांची शक्ती आणि क्षमता समजून घेण्यास आणि त्यांच्या क्षेत्रातील उच्च कामगिरी व साहसाने पुढे जाण्यास मदत करेल.

क्रीडा मंत्री पुढे म्हणाले, "खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षणात मदत करण्यासाठी क्रीडा शास्त्राच्या घटकांचा वापर केला जातो, ज्यामुळे त्यांना त्यांची ताकद समजण्यास, सुधारण्यासाठी आणि त्यांच्या ध्येयापर्यंत त्यांची क्षमता वाढवण्यास मदत केली जाते. क्रीडा विज्ञान खरोखरच खेळाडूंच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. ते त्यांच्यासाठी शक्ती आणि समर्थनाचा स्त्रोत आहे. क्रीडा विज्ञानाच्या सामावेशामुळे त्यांना कितीही आव्हाने आली तरी खेळाडू आपली मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतो. त्यामुळेच आम्ही आमच्या नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्समध्ये स्पोर्ट्स सायन्स विभाग तयार करण्याचे सुनिश्चित करत आहोत.  

दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्रा यानेही खेळाडूंच्या जीवनात क्रीडा शास्त्राच्या आवश्यकतेवर भर दिला आणि प्रशिक्षकांना त्यांच्या कार्यक्रमात त्याचा समावेश करण्याचे आवाहन केले आहे. हि परिषद क्रीडा विज्ञानाच्या क्षेत्रातील आपल्या देशाच्या दूरदर्शी दृष्टिकोनाच्या अग्रगण्य भावनेचा पुरावा आहे. याच्या समावेशामुळे खेळाडूंमध्ये त्यांची क्षमता व प्राविण्य वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. सर्जनशील शोधाची हीच भावना मला क्रीडा विज्ञान परिषदेमध्ये उपस्थित क्रीडा शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि सहभागी खेळाडू यांच्या कार्यातून दिसून येते.

बिंद्रा म्हणाले, "ॲथलीटच्या प्रगतीचे संरक्षक म्हणून प्रशिक्षकांनी या डिजिटल युगात त्यांच्या प्रशिक्षण पद्धती सुधारण्यासाठी क्रीडा शास्त्राचा अंगीकार केला पाहिजे. एक राष्ट्र म्हणून ऑलिम्पिकमध्ये पुढे जाण्यासाठी, आम्हाला क्रीडा शास्त्राचा समावेश करणे आवश्यक आहे. खेळाडूंनी अत्याधुनिक सुविधा वापरत पायाभूत सुविधांच्या प्रत्येक स्तरावर क्रीडा शास्त्राचा समावेश आपल्या जीवनात केला पाहिजे जेणेकरून भारताला जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून विकसित होण्यास मदत होईल.   

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) चे मुख्य पोषणतज्ञ जी वाणी भूषणम; डॉ. प्रलय मजुमदार (वरिष्ठ सल्लागार, क्रीडा विज्ञान शिक्षण आणि संशोधन (क्रीडा विज्ञान आणि विश्लेषण केंद्र, IIT मद्रास); डॉ. नानकी जे चढ्ढा (क्रीडा आणि कामगिरी मानसशास्त्रज्ञ आणि माजी भारतीय गोल्फर); डॉ. पियरे ब्यूचॅम्प (उच्च-कार्यक्षमता संचालक) , नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया); अमेय कोळेकर (स्पोर्ट्स सायन्स हेड, पदुकोण द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलन्स) हे दिग्गज क्रीडा विज्ञान परिषदेत सहभागी होते. 

या परिषदेमध्ये टाप्सचे सीईओ पी के गर्ग यांचे एक विशेष सत्र आणि राष्ट्रीय उत्तेजक विरोधी एजन्सी (NADA) चे वरिष्ठ प्रकल्प सहयोगी श्री वीरेंद्र राजपूत यांचे अखंडता आणि निष्पक्ष खेळ या विषयावर सादरीकरण झाले.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरIndiaभारत