शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

स्मितचे अनपेक्षित विजेतेपद

By admin | Updated: March 7, 2015 01:13 IST

नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या मुलींच्या १५ वर्षांवरील गटात विजेतेपद पटकावले.

मुंबई : नाशिकच्या द्वितीय मानांकित स्मित तोष्णीवाल हिने अनपेक्षित निकाल लावताना नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या मुलींच्या १५ वर्षांवरील गटात विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात स्मितने झुंजार खेळाच्या जोरावर अग्रमानांकित मुंबईच्या सिमरन सिंघीला २-१ असा धक्का दिला.महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) मान्यतेने मालाड येथील गोरेगाव स्पोटर््स क्लब येथे पार पडलेल्या या स्पर्धेत स्मितला पहिला सेट जिंकल्यानंतर अनुभवी सिमरनकडून कडवी लढत मिळाली. यानंतर निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये विजेतेपद हातून निसटणार नाही याची काळजी घेताना स्मितने सिमरनचे कडवे आव्हान २१-१५, १८-२१, २१-१५ असे परतावून लावले. मुलांच्या १५ वर्षांखालील गटात अग्रमानांकित नागपूरच्या रोहन गुरबानी याने अपेक्षित विजेतेपद मिळवताना वलसाडच्या अनिरुद्ध सिंग खुशवाहला २१-१३, २१-१५ असे नमवले. दरम्यान, स्पर्धेच्या प्रत्येक वयोगटातील उपांत्यपूर्व फेरी गाठलेले खेळाडू नवी दिल्ली येथे २३ ते २५ मार्चदरम्यान रंगणाऱ्या अंतिम फेरीसाठी खेळतील. (क्रीडा प्रतिनिधी)च्९ वर्षांखालील : (मुले) : पार्थ देवरे (नाशिक) वि.वि. वंश रोहित (भरुच) २१-१९, २०-२२, २१-१२. (मुली) : तारीनी सुरी (मुंबई) वि.वि. अनन्या नायडू (ठाणे) २१-४, २१-४.च्११ वर्षांखालील : (मुले) : तेजस शिंदे (इस्लामपूर) वि.वि. प्रज्ज्वल सोनावणे (नाशिक) २१-१२, १५-२१, २१-८. (मुली) : तसनीम मीर (मेहसाना) वि.वि. तारा शाह (पुणे) २१-१५, २१-९.मुंबईच्या तनिष्क सक्सेना याने मुलांच्या १३ वर्षांखालील गटात वर्चस्व राखताना नाशिकच्या अमेय खोंडचा २१-१५, २१-९ असा धुव्वा उडवला; तर मुलींच्या याच वयोगटामध्ये साताराच्या अव्वल मानांकित आर्या देशपांडेने आपला हिसका दाखवताना मेहसानाच्या द्वितीय मानांकित तसनीम मीरला २१-१७, २१-१० असे नमवले.