अंडर१९ वर्ल्डकप, भारताचे श्रीलंकेला २६८ धावांचे आव्हान
By Admin | Updated: February 9, 2016 13:13 IST2016-02-09T13:13:32+5:302016-02-09T13:13:32+5:30
भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले आहे.

अंडर१९ वर्ल्डकप, भारताचे श्रीलंकेला २६८ धावांचे आव्हान
ऑनलाइन लोकमत
मिरपूर, दि. ९ - भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. १३ धावात श्रीलंकेचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले.
भारताकडून अनमोलप्रीत सिंगने सर्वाधिक (७२), एसएन खानने (५९) आणि वॉशिंगटन सुंदरने (४३) धावा केल्या. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले आहे.