प्रवास ‘सेकंड’ क्लासमधून

By Admin | Updated: June 6, 2014 22:56 IST2014-06-06T22:56:41+5:302014-06-06T22:56:41+5:30

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ब्राझीलमध्ये दाखल झालेल्या इटली संघाबाबत एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 2

Travel 'seconds' from the class | प्रवास ‘सेकंड’ क्लासमधून

प्रवास ‘सेकंड’ क्लासमधून

>छोटय़ा विमानाचा बसला फटका : इटलीच्या नऊ खेळाडूंची 12 तास घुसमट
रिओ दि जानेरिओ : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ब्राझीलमध्ये दाखल झालेल्या इटली संघाबाबत एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 2क्क्6मध्ये विश्वविजेतेपद पटकावणा:या या संघाचे तब्बल 9 खेळाडू आज चक्क सेकंड क्लासने विमान प्रवास करून ब्राझीलमध्ये दाखल झाले.
ऑङझुरी संघाचे शुक्रवारी सकाळी रिओ दि जानेरिओ विमानतळावर आगमन झाले. इटलीतील रोम शहरातून ‘अॅलिटालिया फ्लाईट’ने हा संघ रिओमध्ये दाखल झाला. हे विमान छोटे असल्याने इटली संघातील 9 खेळाडूंसाठी बिझनेस क्लासमध्ये जागा उपलब्ध नव्हती. यामुळे त्या खेळाडूंसमोर इकॉनॉमी अर्थात सेकंड  क्लासमध्ये प्रवास करण्यावाचून पर्याय नव्हता. सिरो इममोबाईल, अॅलेसिओ सेर्सी, मॅट्टेओ डारमिआ, मॅट्टिआ पेरीन, अॅन्टोनिओ मिरांते, लॉरेंझो इन्साईन, मॅट्टिआ डे सिग्लिओ, अॅण्ड्रिया रॅनोकिया व मार्को पारोलो या खेळाडूंवर ही वेळ आली. 
वर्ल्डकपच्या आपल्या सलामी लढतीत इटलीची गाठ पडणार आहे ती तोलामोलाच्या इंग्लंड संघाविरुद्ध. या महत्वाच्या सामन्याआधी खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये इटलीला विजयाचे दर्शन झालेले नाही.  ‘‘विश्वचषकात खेळण्यासाठी आम्ही सर्व बाजूंनी सज्ज आहोत. झालेल्या सामन्यांची कामगिरी चर्चा उगाळत बसण्याची गरज नाही. माङया खेळाडूंच्या गुणवत्तेबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेसाठी फिटनेस हा सर्वाधिक महत्वाचा असतो. या बाबतीत आम्ही पूर्णपणो सज्ज आहोत. लक्ङोमबगविरुद्धची लढत आम्ही फारशी गंभीरपणो घेतली नव्हतीच. आता आम्ही ब्राझीलच्या वातावरणाशी समरस होऊन विश्वचषकाच्या सरावावर सर्व लक्ष केंद्रित केले आहे,’’ असे पॅ्रन्डेली म्हणाले. 
 
दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझीलचा शेजारी देश असलेला चिलीचा संघ गुरूवारी बेलो हॉरिझोंट येथे दाखल झाला.  या संघाची विश्वचषकातील वाटचाल सोपी नक्कीच नसेल. कारण चिलीचा समावेश असलेल्या ‘ब’ गटात मागील स्पर्धेचा विश्वविजेता स्पेन, उपविजेता नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया संघाचा समावेश आहे. पहिल्या सामन्यात चिली संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहे. 
 
फ्रेंक लॅम्पर्डचा शेवटचा वल्र्डकप
4लंडन : इंग्लंडचा मिडफिल्डर फ्रेंक लॅम्पर्ड याने फुटबॉल वल्र्डकपनंतर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. चेल्सीचे माजी व्यवस्थापक जोस मोरिन्हो यांनी ही माहिती दिली. लॅम्पर्डने गत सत्रच्या शेवटी चेल्सीला सोडचिठ्ठी दिली होती.आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळणार नसला तरी लॅम्पर्ड क्लब स्थरावर आपली छाप सोडणार आहे. मोरिन्हो म्हणाले, 1क्क् हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणा:या एखाद्या खेळाडूची निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मी त्याला वल्र्डकपनंतर न खेळण्याचा सल्ला दिला आहे. लॅम्पर्डने हा सल्ला मानल्याचेही मोरिन्हो म्हणाले. 11क् सामने खेळल्यानंतर निवृत्ती घेणो ही मोठी झेप आहे. तो गोलकीपरप्रमाणो 4क् वर्षार्पयत खेळू शकत नाही.
 
यमजानपदासाठी 
पुन्हा मतदान नाही : ब्लाटर
4साओ पाऊलो : फिफा प्रमुख सेप ब्लाटर यांनी वल्र्डकप 2क्22च्या यजमानपदासाठी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश देण्यास इन्कार केला. पैशांची घेवाणदेवाण करून कतारला 2क्22चे यजमान पद देण्याचा आरोप सध्या सुरू असून, फिफा याचा तपास करीत आहे. हा तपास पूर्ण होईर्पयत कोणताही निर्णय न घेण्याचे ब्लाटर यांनी सांगितले. 
4ब्लाटर यांनी यजमानपदासाठी भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवर थेट बोलणो टाळले. तपास पूर्ण होईर्पयत फिफा कोणतेही भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ब्लाटर म्हणाले, मी पैगंबर नाही. तपासाच्या निकालाची प्रतीक्षा आपल्याला 
करावी लागेल. 
4दरम्यान, वल्र्डकप आयोजनाच्या तयारीत होत असलेल्या विलंबानंतरही फिफाने ही स्पर्धा यशस्वी होण्याचा दावा केला आहे. फिफाने सांगितले की, आयोजनाचे कामकाम नियंत्रणात आणि स्पध्रेची सुरुवात धमाकेदार होईल. फिफाचे महासचिव जेरोम वाल्के यांनी वल्र्डकप आयोजन समितीसह झालेल्या बैठकीनंतर सांगितले की, स्पध्रेची तयारी पूर्ण झालेली आहे; परंतु आम्हाला 12 तारखेला स्पध्रेची धमाकेदार सुरुवात होईल याची पडताळणी करणो आवश्यक आहे. आमच्यासमोरील आव्हाने आम्हाला माहीत आहेत आणि फुटबॉलप्रेमींना खेळाचा मनमुराद आस्वाद अगदी आरामात लुटता, यावा यासाठी आम्ही प्रय}शील आहोत. 
 
जगभरात उत्सुकता.. फिफा वल्र्डकपला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, परंतु त्याची उत्सुकता केवळ ब्राझीलमध्येच नाही, जगभरात पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय पूर्व चीनच्या सुजोऊ या शहरातील एका मॉलमध्ये पाहायला मिळाला. या मॉलमध्ये वल्र्डकपची भली मोठी प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

Web Title: Travel 'seconds' from the class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.