टीम इंडिया जेतेपदाच्या दिशेने : रवी शास्त्री
By Admin | Updated: March 11, 2015 00:45 IST2015-03-11T00:45:58+5:302015-03-11T00:45:58+5:30
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाचा सलग दुसऱ्यांदा विश्वचॅम्पियन बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे, असे मत संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

टीम इंडिया जेतेपदाच्या दिशेने : रवी शास्त्री
हॅमिल्टन : जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाचा सलग दुसऱ्यांदा विश्वचॅम्पियन बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे, असे मत संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
भारतीय संघाने मंगळवारी झालेल्या वर्ल्डकपमधील लढतीत आयर्लंडला ८ विकेटनी धूळ चारली़ या स्पर्धेत भारताचा हा सलग पाचवा विजय ठरला़ त्यामुळे ‘ब’ गटात हा संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे़
भारतीय संघ ज्या प्रकारे कामगिरी करीत आहे, त्यावरून हा संघ नक्कीच स्पर्धेच्या फायनलपर्यंत मजल मारेल, अशी आशा आहे़ विशेष म्हणजे, या पाचही लढतींत भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाला सर्व बाद केले आहे़