हॉलंड गटात अव्वल
By Admin | Updated: June 24, 2014 01:42 IST2014-06-24T01:42:03+5:302014-06-24T01:42:03+5:30
हॉलंडने सोमवारी फिफा विश्वकप लढतीत चिलीचा 2-क् ने पराभव केला आणि ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकाविले.

हॉलंड गटात अव्वल
चिलीवर 2-क् ने मात : लेराय फेर व मम्फिस डीपे यांचे प्रत्येकी 1 गोल
साओ पाउलो : बदली खेळाडू लेराय फेर व मम्फिस डीपे यांनी नोंदविलेल्या शानदार गोलच्या जोरावर हॉलंडने सोमवारी फिफा विश्वकप लढतीत चिलीचा 2-क् ने पराभव केला आणि ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकाविले. दोन्ही गोलमध्ये आर्येन रोबेनची भूमिका महत्त्वाची ठरली. फेरने 77 व्या मिनिटाला संघातर्फे पहिला गोल नोंदविला. रोबेनच्या क्रॉसवर फेरने हेडरद्वारा चेंडूला गोलजाळ्यात पोहोचविले. संघाने खाते उघडल्यानंतर स्टॅन्डमध्ये उपस्थित नियमित कर्णधार रॉबिन वास पर्सीच्या चेह:यावर आनंद झळकला.
सामना संपायला दोन मिनिटांचा अवधी शिल्लक असताना युवा मेम्फिसने संघातर्फे दुसरा गोल नोंदविला. रोबेनने डाव्या बगलेतून आक्रमण करताना मेम्फिसला पास दिला. मेम्फिसने मिळालेल्या संधीचा लाभ घेत संघातर्फे दुसरा गोल नोंदविला. नेदरलँड व चिली संघांनी यापूर्वी ऑस्ट्रेलिया व स्पेन संघांचा पराभव करीत बाद फेरीतील स्थान निश्चित केले होते.
‘ब’ गटात 9 गुणांसह हॉलंड संघ अव्वल स्थानावर असून, 6 गुणांची कमाई करणारा चिली संघ दुस:या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)