शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

Tokyo Paralympics : वर्ल्ड रेकॉर्डसह सुमित अंतिलनं जिंकलं सुवर्ण,२४ तासांत भारतानं जिंकली ७ पदकं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 16:52 IST

भारताचा भालाफेकपटू सुमित यानं पुरुषांच्या F64 भालाफेक गटात पहिल्याच प्रयत्नांत ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला.

मागील २४ तासांतील भारताचे हे सातवे पदक,तर आजच्या दिवसातील पाचवे पदक ठरले.  नेमबाज अवनी लेखराच्या सुवर्णपदकानं आजच्या दिवसाची सुरुवात झाली. भारताचा भालाफेकपटू सुमित यानं पुरुषांच्या F64 भालाफेक गटात वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकले. भारताच्या संदीप एसला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

पहिल्याच प्रयत्नांत ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं आणखी लांब भाला फेकताना ६८.८ मीटर सह नवा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.  ( Sumit Antil throws another World Record of 68.08m in his second attempt in the Men's Javelin Throw F64 Final event). तिसऱ्या प्रयत्नात सुमितनं ६५.२७ मीटर भालाफेक केली, परंतु अन्य स्पर्धकांच्या तुलनेत त्यानं याही फेरीत चांगली कामगिरी करून दाखवली. त्यानं पाचव्या प्रयत्नात पुन्हा ६८.५५ मीटर लांब भालाफेकून पुन्हा स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. या कामगिरीसह त्यानं सुवर्णपदकही नावावर केलं. ( Sumit Antil wins Gold Medal in the Men's Javelin Throw F64 event with a throw of 68.55m!) 

योगेश्वर दत्तला आदर्शस्थानी ठेवताना सुमितलाही कुस्तीपटू बनायचे होते. पण, २०१५मध्ये एका रस्ता अपघातात ट्रॅक्टर त्याच्या पायावरून गेला अन् त्याला एक पाय गमवावा लागला. द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक नवल सिंग यांच्या सांगण्यावरून त्यानं भालाफेकीला सुरूवात केली. २०१८मध्ये त्यानं आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला, परंतु तेव्हा तो पाचव्या क्रमांकावर राहिला होता. त्यानंतर २०१९मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यानं रौप्यपदक जिंकून टोक्यो पॅरालिम्पिकची पात्रता निश्चित केली.  

मागील २४ तासांतील भारताचे हे सातवे पदक,तर आजच्या दिवसातील पाचवे पदक ठरले. ( India have won 7 medals in last 24 hours at #Tokyo2020 #Paralympics). नेमबाज अवनी लेखराच्या सुवर्णपदकानं आजच्या दिवसाची सुरुवात झाली.  टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhra) ने सुवर्णपदकाचा वेध घेतला. यानंतर लगेचच थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाकडून रौप्य, भालाफेक पटू देवेंद्र झाजरिया रौप्य, सुंदर सिंगकडून कांस्य पदक पटकावण्यात आले. अवनी लेखराने सुवर्णपदकाचा वेध घेतला. 10 मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच १ मध्ये तिने हे पदक पटकावले आहे. 

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ