टोक्यो सेक्सवालदेखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत
By Admin | Updated: October 25, 2015 23:52 IST2015-10-25T23:52:54+5:302015-10-25T23:52:54+5:30
दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवणारे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्यासोबत तुरुंगवास भोगलेले टोक्यो सेक्सवाल यांनीदेखील आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या

टोक्यो सेक्सवालदेखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवणारे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्यासोबत तुरुंगवास भोगलेले टोक्यो सेक्सवाल यांनीदेखील आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.
६२ वर्षीय सेक्सवाल यांनी आपण फिफाचे अध्यक्ष बनणारे पहिले आफ्रिकी नागरिक होऊ, अशी आशा व्यक्त केली आहे. तथापि, त्यांची देशांतर्गत फुटबॉलमध्ये कोणतीही सक्रिय भूमिका नाही; परंतु २0१0 मध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप आयोजन समितीत ते सदस्य होते. २0१0 च्या वर्ल्डकपनंतर त्यांना फिफाच्या वंशभेदविरोधी समितीचे सदस्य म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते.
दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे सेक्सवाल यांना फिलिस्तीन आणि इस्राईलमध्ये फुटबॉलच्या विकासावर चर्चेसाठीच्या प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ते सध्या फिफाच्या मीडिया समितीचे सदस्य आहेत.
सेक्सवाल यांच्याशिवाय माईकल प्लातिनी, जॉर्डनचे प्रिन्स अली बिन हुसैन, त्रिनिदाद अँड टोबॅगोचे माजी कर्णधार डेव्हिड नेहकिद आणि फिफाचे माजी उपमहासचिव जेरोम चॅम्पेगनेदेखील फिफाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. सेक्सवाल यांनी वर्णभेद नीतीविरुद्ध केलेल्या कार्यामुळे ते अध्यक्ष बनले जाऊ शकतात आणि त्यांचे राजकीय नेतृत्व फिफाला भ्रष्टाचाराच्या संकटातून बाहेर काढू शकते, असे सेक्सवाल यांच्या पाठीराख्यांचे म्हणणे आहे.
(वृत्तसंस्था)