Tokyo Paralympics: सुवर्ण, रौप्य, रौप्य, कांस्य! सकाळपासून पदकांचा नुसता पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 09:05 AM2021-08-30T09:05:08+5:302021-08-30T09:18:23+5:30

Tokyo Paralympics winners :अवनी लेखरा (Avani Lekhra) ने सुवर्णपदकाचा वेध घेतला. 10 मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच १ मध्ये तिने हे पदक पटकावले आहे. यानंतर काही वेळातच भारताला आणखी तीन पदके मिळाली आहेत.

Tokyo Paralympics: Gold, Silver, Silver, Bronze! Avani Lekhra, Yogesh Kathunia, Devendra Jhajharia, Sundar Singh wins | Tokyo Paralympics: सुवर्ण, रौप्य, रौप्य, कांस्य! सकाळपासून पदकांचा नुसता पाऊस

Tokyo Paralympics: सुवर्ण, रौप्य, रौप्य, कांस्य! सकाळपासून पदकांचा नुसता पाऊस

Next

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhra) ने सुवर्णपदकाचा वेध घेतला. यानंतर लगेचच थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाकडून रौप्य, भालाफेक पटू देवेंद्र झाजरिया रौप्य, सुंदर सिंगकडून कांस्य पदक पटकावण्यात आले. (India's Devendra Jhajharia wins silver, Sundar Singh wins bronze in javelin throw class F46 at Tokyo Paralympics)

Tokyo Paralympics: चीनला नमविले! नेमबाज अवनी लेखराचा सुवर्णवेध

अवनी लेखरा (Avani Lekhra) ने सुवर्णपदकाचा वेध घेतला. 10 मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच १ मध्ये तिने हे पदक पटकावले आहे. 


भारताला मिळालेली पदके....
रविवारी भाविनाबेन पटेलने महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत क्लास 4 मध्ये आणि निषाद कुमारने पुरुषांच्या टी 47 उंच उडी स्पर्धेत रौप्य दक पटकावले. तसेच थाळीफेकमध्ये विनोद कुमारने रविवारी कांस्य पदक पटकावले होते. मात्र, त्याच्या अपंगत्वाच्या प्रकारावर आक्षेप घेतल्याने त्याला याचा आनंद साजरा करता आला नव्हता. यामुळे पदक समारंभ 30 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. 

Web Title: Tokyo Paralympics: Gold, Silver, Silver, Bronze! Avani Lekhra, Yogesh Kathunia, Devendra Jhajharia, Sundar Singh wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.