शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

Tokyo Olympics: रवी दहियाचे सुवर्ण यश एका पावलाने दूर; दीपक पूनियाला कांस्यची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 7:52 AM

Tokyo Olympics Live Updates: ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजांनंतर पदकांची सर्वाधिक आशा होती ती कुस्तीपटूंकडून. नेमबाजांनी निराशा केली असली, तरी कुस्तीपटूंनी मात्र आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविताना पदकांचे खाते उघडले आहे.

चीबा (जपान) : ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजांनंतर पदकांची सर्वाधिक आशा होती ती कुस्तीपटूंकडून. नेमबाजांनी निराशा केली असली, तरी कुस्तीपटूंनी मात्र आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविताना पदकांचे खाते उघडले आहे. यामध्ये सर्वांत प्रभावी ठरला तो रवी दहिया. रवीने ५७ किलो फ्रीस्टाईल गटात कझाखस्तानच्या नूरइस्लाम सानायेव याला नमवत अंतिम फेरी गाठली आहे. त्याचवेळी, दीपक पूनिया व अंशू मलिक यांना पराभव झाल्याने आता कांस्य पदकासाठी लढावे लागेल.अत्यंत थरारक झालेल्या उपांत्य सामन्यात रवी एका क्षणाला २-९ असा पिछाडीवर होता. मात्र, त्याने जबरदस्त पुनरागमन करत सानायेव याला जोरदार टक्कर देत सामन्याचे चित्रच पालटले. सानायेववर पकड मिळवत त्याला मॅटवर चीत करत रवीने लढत जिंकली आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली. रवीने याआधीचे दोन्ही सामने तांत्रिक गुणांच्या आधारे जिंकले. पहिल्या फेरीनंतर रवीकडे २-१ अशी आघाडी होती. मात्र, सानायेवने रवीच्या डाव्या पायावर आक्रमण करत त्याला तीनवेळा पलटण्यास भाग पाडत थेट सहा गुणांची कमाई केली होती. 

 पूनिया मोक्याच्या क्षणी चुकला- दीपक पूनियाने ८६ किलो वजगी गटात सोप्या ड्रॉचा फायदा घेत आगेकूच केली. पहिल्या फेरीत त्याने नायजेरियाच्या एकेरेकेमे एगियमोर याला मात दिली. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याने चीनच्या जुशेन लिन याला ६-३ असे लोळवले. - उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलरविरुद्ध दीपक निष्प्रभ ठरला. एकतर्फी झालेल्या या लढतीत टेलरने पहिल्याच मिनिटाला धोबीपछाड करत ९-० अशी भक्कम आघाडी मिळवली. यानंतर त्याने १०-० अशा एकहाती विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. दीपककडे अजूनही कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे.

टॅग्स :IndiaभारतWrestlingकुस्तीindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021