शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: मराठमोळ्या प्रवीण जाधवचा अचूक निशाणा, गाठली पुरुष गटाची उपउपांत्यपूर्व फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 13:25 IST

Tokyo Olympics: जपानमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मराठमोळ्या प्रवीण जाधवने जबरदस्त कामगिरी केली आहे. प्रवीण जाधवने रशियन ऑलिम्पिक समितीच्या बझारपोव्ह गॅल्सनवर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

टोकियो - जपानमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मराठमोळ्या प्रवीण जाधवने जबरदस्त कामगिरी केली आहे. प्रवीण जाधवने रशियन ऑलिम्पिक समितीच्या बझारपोव्ह गॅल्सनवर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रवीण जाधव याने राऊंड ऑफ ३२ मध्ये बझारपोव्ह गॅल्सनचा ६-० अशा फरकाने धुव्वा उडवला. (Indian archer Pravin Jadhav beats Galsan Bazarzhapov of Russian Olympic Committee 6-0)

या लढतीत प्रवीण जाधव सुरुवातीपासूनच फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने अचूक निशाणा साधत पहिल्या सेटमध्ये १०,९,१० असा स्कोअर केला. त्याचा एकूण स्कोअर २९ राहिला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने ९,९,१० असा मिळून २८ स्कोअर केला. तिसऱ्या सेटमध्येही प्रवीणने ९,९,१० असा मिळून २८ स्कोअर केला. तिन्ही सेट जिंकल्याने प्रवीण जाधवला एकूण सहा गुण मिळाले. त्याबरोबच त्याने बझारपोव्हचा ६-० ने पराभव केला.

सिंधूची विजयी घोडदौडदरम्यान, पी. व्ही. सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. सिंधूने महिला एकेरीमध्ये आज झालेल्या लढतीत हाँगकाँगच्या नगन यी चेंगवर सरळ गेममध्ये मात केली. सिंधूने हा सामना २१-९, २१-१६ असा जिंकला. आज हाँगकाँगच्या नगन यी चेंग हिच्याविरुद्ध झालेल्या लढतीत सिंधूने पहिल्या लढतीप्रमाणेच आक्रमक खेळ करत एकतर्फी वर्चस्व राखले. सिंधूने पहिला गेम २१-९ असा आरामात जिंकत सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये हाँगकाँगच्या खेळाडूने सिंधूला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची झुंज मोडीत काढत हा गेमही सिंधूने २१-१६ अशा फरकाने जिंकत पुढची फेरी गाठली.

टॅग्स :india at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021IndiaभारतOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021