Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूनं केली रौप्यपदकाची कमाई, नेमकं किती रुपयांचं मिळणार पारितोषिक? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 03:50 PM2021-07-24T15:50:50+5:302021-07-24T15:53:21+5:30

Tokyo Olympics 2020, Mirabai Chanu: मीराबाई चानू हिला पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदरात निराशा पडली होती. पण त्यावर मात करुन अखेर तिनं भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. 

Tokyo Olympics 2020 Siver Medalist Mirabai Chanu to recieve huge cash prize from IOA and Manipur Government | Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूनं केली रौप्यपदकाची कमाई, नेमकं किती रुपयांचं मिळणार पारितोषिक? जाणून घ्या...

Tokyo Olympics 2020: मीराबाई चानूनं केली रौप्यपदकाची कमाई, नेमकं किती रुपयांचं मिळणार पारितोषिक? जाणून घ्या...

Next

Tokyo Olympics 2020, Mirabai Chanu: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्याच दिवशी भारताच्या महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं ४९ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदकाची कमाई करुन दिली. पदकाची मानकरी होताच मीराबाईनं गेल्या पाच वर्षांपासूनचं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. (Tokyo Olympics 2020: Siver Medalist Mirabai Chanu to recieve huge cash prize from IOA and Manipur Government)

प्रशिक्षणासाठी २२ किमीचा रोजचा प्रवास अन् डिप्रेशनवर मात!, मीराबाई चानूनं ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास

ऑलिम्पिकमध्ये यंदा भारताकडून १२५ खेळाडूंचं पथक टोकियोमध्ये दाखल झालं आहे. देशातील विविध राज्यांमधून खेळाडू भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी टोकियोला गेले आहेत. यात विविध राज्यांनी आपल्या खेळाडूंसाठी विविध पारितोषिकांची घोषणा देखील केली आहे. मीराबाई चानू मूळची मणिपूरची आहे आणि येथील सरकारनं गेल्याच महिन्यात आपल्या राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पारितोषिकाची घोषणा केली होती. राज्यांसोबतच भारतीय ऑलिम्पिक संघानंही (आयओए) पदक विजेत्या खेळाडूंसाठी पारितोषिकं जाहीर केली आहेत. 

आयओएकडून केल्या गेलेल्या घोषणेनुसार सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना ७५ लाख, रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना ४० लाख आणि कांस्य पदक विजेत्या खळाडूंना २५ लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यानुसार मीराबाई चानू हिला आयओएकडून ४० लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 

'स्वप्न पूर्ण झालं...भारत माता की जय!', रौप्यपदक विजेत्या मीराबाईची चानूची पहिली प्रतिक्रिया

दुसरीकडे, मणिपूर सरकारनं आपल्या राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना देखील पारितोषिकाची घोषणा केली होती. त्यानुसार सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला १.२० कोटी आणि रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना १ कोटी रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यानुसार मीराबाई चानू हिला मणिपूर सरकारकडून १ कोटी रुपायांचं पारितोषिक मिळणार आहे. म्हणजेच ऑलिम्पिकच्या रौप्य पदकासह मीराबाई चानू हिला आता एकूण १ कोटी ४० लाख रुपायंचं पारितोषिक देखील मिळणार आहे. यासोबत इतर काही विभागातूनही मीराबाई हिला पारितोषिकांची घोषणा केली जाऊ शकते. 

Web Title: Tokyo Olympics 2020 Siver Medalist Mirabai Chanu to recieve huge cash prize from IOA and Manipur Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app