शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

Mirabai Chanu, Tokyo Olympics: प्रशिक्षणासाठी २२ किमीचा रोजचा प्रवास अन् डिप्रेशनवर मात!, मीराबाई चानूनं ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 1:51 PM

Tokyo Olympics, Mirabai Chanu Sliver Medal: मीराबाईचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक संकटांवर मात करुन ती आजचं यश अनुभवत आहे.

Tokyo Olympics, Mirabai Chanu Sliver Medal: जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अभियानाची दमदार सुरुवात झाली आहे. भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं आज झालेल्या ४९ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे पहिलं पदक ठरलं आहे. 

जय हो! वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूला रौप्यपदक; टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं

टोकियोमध्ये इतिहास रचल्यानंतर मिराबाई चानूच्या मणिपूर येथील राहत्या घरी देखील जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. पण मिराबाई चानू हिचा आजवरचा प्रवास फार खडतर राहिला आहे. खूप संघर्षानंतर मीराबाई चानू हिला आजचा दिवस पाहायला मिळतो आहे. 

मणिपूरच्या मीराबाईनं आपल्या आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. मीराबाईला वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी दररोज पहाटे उठून २२ किलोमीटरचा प्रवास करुन प्रशिक्षण केंद्रात जावं लागायचं. तिथून आल्यानंतर पुन्हा शाळेची तयारी आणि शाळेतून घरी आल्यावर अभ्यास यातच संपूर्ण दिवस निघून जायचा. मीराबाईचं गाव इम्फाळपासून २२ किमी दूरवर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईच्या पदरात निराशा आली होती. कारण याकाळात ती नैराश्याचा सामना करत होती. वेटलिफ्टिंमधून निवृत्त होण्याचाही विचार तिच्या मनात आला होता. पण नैराश्यावरही मात करुन मीराबाईनं दमदार पुनरागन केलं आणि आज टोकियोमध्ये इतिहास रचला. ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारी मीराबाई दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यासोबतच वेटलिफ्टिंमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी देखील ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. याआधी २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीनं कांस्य पदकाची कमाई केली होती. 

मीराबाईनं मणिपूरच्या कुंजुरानी यांना पाहून वेटलिफ्टर होण्याचा निश्चय केला आहे. २००७ साली जेव्हा तिनं सरावाला सुरुवात केली तेव्हा तिच्याकडे लोखंडी रॉड नव्हते, त्यावेळी लाकडी रॉडनंच तिला सराव करावा लागत होता. आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू व्हायचं म्हटलं तर आहारावरही लक्ष द्यावं लागतं आणि मीराबाईच्या आहाराची गरज पूर्ण करणं त्यांच्या कुटुंबीयांना परवडणारं नव्हतं. तरीही मीराबाईच्या आईनं खडतर मेहनत करुन तिच्या आहारात कोणताही कमतरता येणार नाही याची काळजी घेतली. 

कुटुंबीयांनी आपल्यावर केलेला खर्च आणि त्यांनी पाहिलेले हलाकिचे दिवस तिला रिओ ऑलिम्पिकमध्ये आलेल्या अपयशानंतर फारच मनला लागले. त्यानंतर ती नैराश्यात गेली. पण त्यावरही मात करुन तिनं आणखी मेहनत करण्याचा निश्चय केला आणि ती सातत्यानं सराव करण्यास सुरुवात केली. रिओ ऑलिम्पिकमधील अपयशानंतर मीराबाई जास्तीत जास्त वेळ प्रशिक्षण केंद्रातच व्यतीत करायचं. ती घरी कमी आणि प्रशिक्षण केंद्रात जास्तवेळ राहू लागली. याआधी मीराबाईनं २०२१४ साली ग्लासगोमध्ये झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. तर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत तिनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021