शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Tokyo Olympic : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं ज्यांना 'खाऊ' वाटतं, त्यांनी हा Video पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 18:45 IST

Tokyo Olympic : टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहे.

Tokyo Olympic : टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस, तिरंदाजी, नेमबादी, जिमनॅस्टीक्स आदी खेळांमध्ये तर मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकविजेते खेळाडू यंदा पहिल्या-दुसऱ्या फेरीत बाद झालेले पाहायला मिळत आहेत. जागतिक नेमबाजी स्पर्धेत पदकांची लयलुट करणारे भारतीय नेमबाज ऑलिम्पिकमध्ये अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यावर लगेच टीका होताना दिसत आहेत. वर्ल्ड कपमध्ये जिंकता मग इथे का नाही, असा प्रश्न करणारे मीम्स सोशल मीडियावर १९ वर्षीय मनू भाकेरच्या नावानं व्हायरल झाले आहेत. पण, ज्यांना असं वाटतं की ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणं 'खाऊ' आहे त्यांनी एकदा हा व्हिडीओ पाहाच.

Mary Kom : ना टीम इंडियाचं नाव, ना तिचं; लढतीपूर्वी मेरी कोमला आयोजकांनी बदलायला लावली जर्सी, पण का?

दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडू हा तितक्याच ताकदिनं, अफाट इच्छाशक्ती आणि प्रबळ निर्धार घेऊन मैदानावर उतरतो. पदक जिंकण्याच्या ओझ्यासह कोट्यवधी देशवासीयांच्या अपेक्षांचे दडपणही त्यानं खांद्यावर घेतलेले असते. अशात एक चूकही महागात पडू शकते, हा सततचा दबाव त्याच्या मनात सुरू असतो. त्याक्षणी जो खेळाडू या दडपणाला झुगारून लावतो, तो बाजी मारतो.. पण, म्हणून आपले खेळाडू वाईटच खेळले असा अर्थ होत नाही. 

पाहा व्हिडीओ... मेरी कोमचा धक्कादायक पराभव, पण इतरांनी दाखवले पदकाचे स्वप्न...टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आजचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पी व्ही सिंधून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय पुरुष हॉकी संघानं अ गटातील सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनावर ३-१ असा दणदणीत विजय मिळवला, तिरंदाजीत अतनू दासनं दोन वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला हार मानण्यास भाग पाडले. पण, आजच्या दिवसाच्या दुसऱ्या टप्प्यात भारताला मोठा धक्का बसला. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या मेरीला पराभवाचा धक्का बसला. ३८ वर्षीय मेरी कोमने कोलंबियाच्या प्रतिस्पर्धीला कडवी टक्कर दिली, परंतु भारताच्या दिग्गज बॉक्सरचा प्रवास इथेच संपला. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Social Mediaसोशल मीडिया