शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

Tokyo Olympic :प्रसिद्ध हिरे व्यापारी भारतीय महिला हॉकी संघाला घरासाठी पैसे, कार देणार; पदक जिंकून आणा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 20:13 IST

Tokyo Olympic, women Hockey Team, Savji Dholakia promise: भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून टोक्यो ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अर्जेंटिनाने भारतीय संघाला 2-1 ने हरविले होते. आता कांस्य पदकासाठी भारतीय टीम उद्या ग्रेट ब्रिटनसोबत लढणार आहे.

गुजरातचे अब्जाधीश असेलेले हिरे व्यापारी सावजी ढोलकिया (Savji Dholakia ) यांनी मोठी घोषणा केली आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चांगले प्रदर्शन करणाऱ्या भारतीय महिला हॉकी टीमच्या (Indian women hockey team) प्रत्येक खेळाडूला बक्षीस देण्याचे आश्वासन दिले आहे. (Gujarat Diamond Merchant Savji Dholakia Promises Houses, Cars For Women's Hockey Team)

भारतीय महिला हॉकी टीम सेमी फायनलमध्ये हरली आहे, तरीही उद्या कास्य पदकासाठी मॅच होणार आहे. ढोलकिया यांची कंपनी ज्या खेळाडूंना घरे बांधायची आहेत, त्यांना 11 लाख रुपयांची मदत देणार आहेत. याचबरोबर जर भारतीय संघाने पदक जिंकले तर ज्यांच्याकडे आधीपासून राहण्यासाठी घर आहे त्यांना 5 लाख रुपये एवढ्या किंमतीची कार देणार आहेत. ढोलकिया हे आपल्या कर्मचाऱ्यांना घरे, गाडीपासून बंपर दिवाळी बोनस देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 

ढोलकिया यांनी मंगळवारी ट्विट करून यांची माहिती दिली. आपला एचके ग्रुप महिलांच्या हॉकी टीमच्या खेळाडूंचा सन्मान करणार आहे. यासाठी जे खेळाडू घर घेऊ इच्छित आहेत त्यांना 11 लाख रुपये देण्यात येतील. ढोलकियांच्या या घोषणेनंतर अन्य काही लोकांनी देखील या संघाला बक्षिसे देण्याची घोषणा केली आहे. ढोलकिया यांनी पुढे म्हटले की, अमेरिकेतील माझ्या भावाचे मित्र डॉ. कमलेश दवे सर्व विजेत्यांना एक एक लाख रुपये देणार आहेत. 

सेमीफायनलमध्ये काय झाले...भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून टोक्यो ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अर्जेंटिनाने भारतीय संघाला 2-1 ने हरविले होते. आता कांस्य पदकासाठी भारतीय टीम ग्रेट ब्रिटनसोबत लढणार आहे. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Hockeyहॉकी