शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्राच्या 'गोल्ड'नं भारतीयांनी घेतला टोकियोचा निरोप; ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकाचा नोंदवला विक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 6:57 PM

Tokyo Olympic, Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा शनिवारी संपल्या.

Tokyo Olympic, Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा शनिवारी संपल्या. भारताची गोल्फपटू अदिती अशोक हिनं पदकाच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर दुपारच्या सत्रात कुस्तीपटू बजरंग पुनियानं कांस्यपदक नावावर केले. त्यानंतर सायंकाळी नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी केली. भालाफेकपटू नीरजनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. १२५ वर्षांत अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. या पदकासह भारताने ऑलिम्पिक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कागगिरीचीही नोंद केली.  २००८ नंतर म्हणजेच १३ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. २००८ मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीरज हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. चेक प्रजासत्ताकचे जाकूब व्हॅद्लेजच ( ८६.६७ मीटर) आणि व्हिटेझस्लॅव्ह ( ८५.४४ मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले.  कोरोना संकटाच्या काळात नीरज चोप्रानं पंतप्रधान सहाय्यता निधीत दोन लाख, तर हरयाणा सरकारला १ लाखांची मदत केली होती. नीरजने आज सुवर्णपदक जिंकून भारताला टोकियोत एकूण ७ वे पदक जिंकून दिले. आतापर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ६ ( दोन रौप्य व ४ कांस्य) पदकं जिंकली होती. टोकियोत वेटलिफ्टर मीराबाई चानूनं रौप्यपदक जिंकून पदकाचे खाते उघडले. त्यापाठोपाठ कुस्तीपटू रवी कुमार दहिया ( रौप्य), बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, भारतीय पुरुष हॉकी संघ, बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोईन व कुस्तीपटू बजरंग पुनिया ( सर्वांनी कांस्य) यांनी पदकाची कमाई केली. भारतीय संघ ४७व्या क्रमांकावर आहे. 

  • ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची कामगिरी - २०२१ - ७ ( १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य), २०१२ - ६ ( २ रौप्य व ४ कांस्य), २००८ - ३ ( १ सुवर्ण व २ कांस्य), १९५२ -२ ( १ सुवर्ण व १ कांस्य), २०१६ - २ ( १ रौप्य व १ कांस्य)  
  • ८ सुवर्णपदकं - पुरुष हॉकी संघ- 1928,1932,1936,1948,1952,1956,1964,1980
  • १ अभिनव बिंद्रा - २००८च्या बिजींग ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकार
  • १ नीरज चोप्रा - २०२० टोकियो ऑलिम्पिक भालाफेक
टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Neeraj Chopraनीरज चोप्राPV Sindhuपी. व्ही. सिंधूLovelina Borgohainलव्हलीना बोरगोहाईंMirabai Chanuमीराबाई चानू