आज स्मिथबद्दलचा आदर आणखी वाढला - सुनील गावस्कर
By Admin | Updated: March 28, 2017 18:07 IST2017-03-28T17:39:26+5:302017-03-28T18:07:57+5:30
प्रतिस्पर्ध्याचे लक्ष विचलित करण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्लेजिंग करताना कोणत्याही थराला जातात.

आज स्मिथबद्दलचा आदर आणखी वाढला - सुनील गावस्कर
ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचे मैदानावरील वर्तन नेहमीच प्रतिस्पर्धी संघाला चीड आणणारे असते. प्रतिस्पर्ध्याचे लक्ष विचलित करण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्लेजिंग करताना कोणत्याही थराला जातात.आपल्या वागण्याबद्दल कधीही त्यांच्या मनात पश्चातापाची भावना नसते. पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ मात्र याला अपवाद आहे.
स्मिथने मैदानावर चूक केली पण नंतर प्रांजळपणे त्या चुकीची कबुलीही दिली. स्मिथच्या या वर्तनाने भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर प्रभावित झाले आहेत. चूक मान्य करण्यासाठी अंगी मोठेपण असावे लागते. ते स्मिथकडे आहे. आपण चुकलो हे त्याने मान्य केले. त्याच्याबद्दलचा माझ्या मनातील आदर आज आणखी वाढला अशा शब्दात गावस्करांनी स्मिथचे कौतुक केले.
गावस्करांप्रमाणे भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानेही स्मिथचे कौतुक केले. स्मिथ चांगला फलंदाजच नाही तर, चांगला माणसूही आहे असे चोप्रा म्हणाले. चौथ्या कसोटीच्या आज चौथ्या दिवशी भारताने सामन्यासह मालिका 2-1 ने जिंकली.