शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट दिव्यांग खेळाडूचा राज्य पुरस्कार प्राप्त भानुप्रिया यांच्यावर मास्क विकण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 03:46 IST

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट दिव्यांग खेळाडूचा पुरस्कार प्राप्त करणारी जिद्दी, मेहनती दिव्यांग महिला भानुप्रिया यांच्यावर कोरोनामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मास्क विकण्याची वेळ आली आहे.

मुंबई : दोन्ही पाय अधू असणारी हरहुन्नरी गायिका, कॅरम, पॉवर लिफ्टिंग, जलतरण क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट दिव्यांग खेळाडूचा पुरस्कार प्राप्त करणारी जिद्दी, मेहनती दिव्यांग महिला भानुप्रिया यांच्यावर कोरोनामुळे कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मास्क विकण्याची वेळ आली आहे.वडाळा येथे भानुप्रिया वास्तव्यास आहेत. जन्मानंतर सहा महिन्यांनी त्यांना पोलिओ झाला. दोन्ही पायांनी पोलिओग्रस्त असलेल्या भानुप्रिया यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. आपल्या या छोट्याशा कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी टेलरिंगचे काम करणाऱ्या भानुप्रिया यांच्या व्यवसायावर कोरोनामुळे गदा आली. अशा वेळी ताराई फाउंडेशन त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांना स्टॉल उपलब्ध करून दिला. आता त्या मास्क बनवून तेथे विकतात. जिद्दीच्या बळावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीचा त्यांचा संघर्ष सुरूख् आहे.दिव्यांगांच्या जलतरण क्रीडा प्रकारात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचा आवाज सुरेल आहे. त्या आॅर्केस्ट्रामध्ये गातात. मात्र सध्या सर्वच कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे आता पोटापाण्यासाठी मास्क विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. प्रत्येक मास्कमागे दहा रुपये मिळतात. मात्र एवढ्याने भागत नाही. त्यामुळे स्वत:सह मुलांच्या उदरनिर्वाहाची चिंता त्यांना सतावत आहे.सरकारने पुढाकार घ्यावाकोरोना संकटकाळात आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या दिव्यांग खचले आहेत. रेशनची मदत पुरेशी नाही. दिव्यांगांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, असे भानुप्रिया यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई