शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मातीचं घर, लाईट-पाणी नाही; MS Dhoniच्या राज्यातील आशाची राष्ट्रकुल स्पर्धेत 'रौप्य'क्रांती!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 12:52 PM

महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खूप मोठं नाव... झारखंड राज्यातील रांची येथील एक सामान्य कुटुंबातील 'माही' भारतीय क्रिकेटचा स्टार बनला...

महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खूप मोठं नाव... झारखंड राज्यातील रांची येथील एक सामान्य कुटुंबातील 'माही' भारतीय क्रिकेटचा स्टार बनला... आयसीसीच्या तीन प्रमुख ( ट्वेंटी-२०वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी ) स्पर्धा जिंकणारा जगातील एकमेव कॅप्टन कूलची संपती ७००-८०० कोटींच्या घरात आहे. पण, हे आज सांगण्याचं कारण की... त्रिनबागो येथे सुरू असलेल्या युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत धोनीच्या राज्यातील कन्येने रौप्यक्रांती केली आहे.  त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे ४ ते ११ ऑगस्ट या कालावधीत पार पडली अन् त्यात भारताच्या आशाकिरण बार्लाने ८०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले.

आशाने महिलांच्या ८०० मीटर शर्यतीत २:०४.९९ सेकंदाच्या वेळेसह रौप्यपदक जिंकले. इंग्लंडची गिल फोएबे ( २:०२.३० सेकंद) आणि ऑस्ट्रेलियाची कूपर फ्लूर ( २:०५.८६ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले. रांचीपासून १०० किलोमीटर दूर असलेल्या गुलमा या आदिवासी जिल्ह्यातला आशाचा जन्म... मातीच्या घरात लहानाची मोठी ती झाली. ज्या घरात लाईट नाही, पिण्याचं पाणी येत नाही. अशा कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या आशाने आज युवा राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ऐतिहासिक रौप्यपदक जिंकून दिले.

आशाने जेव्हा भोपाळमध्ये पार पडलेल्या युवा राष्ट्रीय स्पर्धेत ८०० मीटर शर्यतीचे जेतेपद पटकावले होते, तेव्हा तिला हा आनंद आपल्या आईला सांगायचा होता. पण, तिला दोन दिवस वाट पाहावी लागली. तिचा जिल्हा हा नक्षलग्रस्त आहे. तिच्या पदक जिंकल्याची बातमी आईला शेजाऱ्यांकडून समजली. त्यांच्याच फोनवरून आईने तिला कॉल केला. आशा बोकारो येथील आशू भाटीया यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेते.

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाranchi-pcरांची