विजयवाडा : अवघ्या तीन वर्षांची तिरंदाज चेरुकुरु डॉली शिवानी हिने मंगळवारी ३६ अॅरोमध्ये अधिकाधिक नेम साधून इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये स्वत:च्या नावाची नोंद केली आहे.व्होल्गा आर्चरी अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या शिवानीने सात मीटर अंतरावरुन १२२ सेंटीमीटर तसेच पाच मीटर अंतरावरुन ८० सेंटीमीटरच्या लक्षयावर ३६ पैकी अधिकाधिक नेम साधून ३८८ गुण पटकावले. साईचे पर्यवेक्षक पी. रामाकृष्णा यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांच्या मुलीने इतकी देदिप्यमान कामिगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिची कामगिरी आशिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंदली जावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)
तीन वर्षांच्या शिवानीचा तिरंदाजीत विक्रम
By admin | Updated: March 26, 2015 02:05 IST