शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयच्या मान्यतेसाठी उत्तराखंडच्या तीन संघटना एकत्र

By admin | Updated: January 28, 2015 02:15 IST

बीसीसीआयची मान्यता मिळावी यासाठी उत्तराखंडमध्ये कार्यरत तिन्ही क्रिकेट संघटनांनी विलीनीकरण करीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआयची मान्यता मिळावी यासाठी उत्तराखंडमध्ये कार्यरत तिन्ही क्रिकेट संघटनांनी विलीनीकरण करीत एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात क्रिकेटच्या पाच वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत. यापैकी तीन उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन, अभिमन्यू क्रिकेट असोसिएशन आणि युनायटेड क्रिकेट असोसिएशन यांनी बीसीसीआयची संलग्नता मिळविण्यासाठी संयुक्त असोसिएशन बनविण्याचा निर्णय घेतला. सन २००० मध्ये उत्तर प्रदेशचे विभाजन होऊन उत्तराखंड हे नवे राज्य निर्माण करण्यात आले. पण राज्यातील एकाही संघटनेला बीसीसीआयने मान्यता दिली नाही. दुसरीकडे त्याच वर्षी वेगळे झालेल्या झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांना क्रिकेट संघटनेचा दर्जा देण्यात आला आहे.युनायटेड क्रिकेट असोसिएशनचा एक अधिकारी म्हणाला, ‘बीसीसीआयची मान्यता नसल्याने राज्यातील खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी अन्य राज्य संघांमधून खेळावे लागत आहे. सोमवारी तिन्ही संघटनांची संयुक्त बैठक होऊन खेळाडूंच्या हितासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला.’ सन २००९ मध्ये यूसीएने मान्यतेसाठी आपला अहवाल मुंबई येथे बीसीसीआयच्या अ‍ॅफिलिएशन समितीकडे पाठविला होता.