शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

Thomas Cup : भारताची ऐतिहासिक कामगिरी, ७३ वर्षांत थॉमस चषक स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 15:23 IST

Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी  ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस  चषक स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच पदक पटकावले आणि तेही सुवर्णपदक....

Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी  ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस  चषक स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच पदक पटकावले आणि तेही सुवर्णपदक.... ही स्पर्धा १४ वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियावर विजय मिळवून भारतीय पुरुष संघाने इतिहास घडवला. थॉमक चषक स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. भारताने उपांत्य फेरीत डेन्मार्कवर ३-२ असा थरारक विजय मिळवला होता, तत्पूर्वी त्यांनी मलेशियावर मात केली होती. उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारताने कांस्यपदक  पक्के केले होते, परंतु त्यांनी थेट सुवर्णपदकावर नाव कोरले. लक्ष्य सेन, सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टीव, किदम्बी श्रीकांत, एम आर अर्जुन, ध्रुव कपिला व एचएस प्रणॉय हे या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले.

आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतासमोर तगड्या इंडोनेशियाचे आव्हान होते. इंडोनेशियाच्या पुरुष संघाने सर्वाधिक १४ वेळा थॉमस चषक उंचावला आहे. पण, भारतीय खेळाडूंच्या मजबूत निर्धारासमोर त्यांनी हार मानली. पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने ( Lakshya Sen) कडव्या संघर्षानंतर इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिंटींगवर ८-२१, २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर लक्ष्यने दमदार पुनरागमन केले. ७-१२ अशा पिछाडीवरून लक्ष्यने दुसऱ्या गेममध्ये कमबॅक करताना २१-१७ अशी बाजी मारली आणि त्यानंतर निर्णायक गेममध्ये २१-१६ असा विजय मिळवून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.  

दुहेरीत सात्विकराज रँकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनीही ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारली. मोहम्मद अहसेन व केव्हिन संजया सुकामुल्जो यांच्या विरुद्धचा दुसरा गेम कमालीचा चुरशीचा झाला. पण, भारतीय जोडी वरचढ ठरली. सात्विक व चिराग यांनी हा सेट १८-२१, २३-२१, २१-१९ असा जिंकून भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली.  आता उर्वरित तीन सामन्यांत भारताला एक विजय पुरेसा होता, तर इंडोनेशियाला तीन... त्यामुळे सर्वांचे लक्ष्य एकेरीच्या लढतीत स्टार किदम्बी श्रीकांत याच्यावर लागले. श्रीकांतचा सामना जोनाथन ख्रिस्टी याच्याशी होता, परंतु श्रीकांतने पहिला गेम २१-१३ असा जिंकून प्रतिस्पर्धीवर दडपण निर्माण केले. मात्र, इंडोनेशियाच्या खेळाडूने दुसऱ्या गेममध्ये चिवट झुंज दिली. ८-१२ अशा पिछाडीवरून त्याने १६-१३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर गेम १८-१८ असा आणखी चुरशीचा बनला. ख्रिस्तीने २०-१९ अशी आघाडी घेत गेम पॉईंट मिळवला, पंरतु श्रीकांतने २०-२० अशी बरोबरी घेतली. २२-२१ अशी आघाडी घेत श्रीकांतने गेम पॉईंट मिळवला आणि २३-२१ असा विजय मिळवून इतिहास घडवला. भारताने ३-० अशा फरकाने इंडोनेशियाला नमवून सुवर्णपदक नावावर केले. 

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारतIndonesiaइंडोनेशिया