Thomas and Uber Cup badminton tournament postponed, decision due to withdrawal of six teams | थॉमस व उबेर कप बॅडमिंटन स्पर्धा स्थगित, सहा संघांच्या माघारीमुळे निर्णय

थॉमस व उबेर कप बॅडमिंटन स्पर्धा स्थगित, सहा संघांच्या माघारीमुळे निर्णय

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर आघाडीच्या संघांनी माघार घेतल्यामुळे विश्व बॅडमिंटन महासंघाने डेन्मार्कमध्ये आयोजित थॉमस व उबेर कप बॅडमिंटन स्पर्धा मंगळवारला पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
भारताने ३ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत डेन्मार्कच्या आरहसमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी महिला व पुरुष संघांची घोषणा केली होती.
दरम्यान, कोरोना महामारीमुळे थायलंड, आॅस्ट्रेलिया, चीनी ताइपे व अल्जिरिया या संघांनंतर शुक्रवारी इंडोनेशिया व दक्षिण कोरियानेही नाव परत घेतल्यामुळे बीडब्ल्यूएफने रविवारी आपात्कालीन व्हर्च्युअल बैठक बोलविली. महासंघाने स्पष्ट केले की,‘बॅडमिंटन विश्व महासंघ यजमान बॅडमिंटन डेन्मार्कच्या सहमतीने थॉमस व उबेर कप २०२० स्थगित करण्याचा खडतर निर्णय घेत आहे.’ त्यात पुढे म्हटले आहे की,‘अनेक संघांनी स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. बीडब्ल्यूएफ विश्व टूरच्या युरोपियन शेड्युलमुळे आता या स्पर्धेसाठी २०२१ पूर्वी पर्यायी कार्यक्रम निश्चित करणे कठीण आहे.’ बीडब्ल्यूएफने सिंगपूर व हाँगकाँगचा समावेश करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नकार दिला. चीन व जपान हे संघही माघार घेण्याबाबत विचार करीत होते, असे वृत्त आहे.
भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालनेही अशा वेळी स्पर्धेच्या आयोजनावर चिंता व्यक्त केली होती. सायना व पी.व्ही. सिंधू महिला संघाचे प्रतिनिधित्व करीत होत्या तर पुरुष संघात किदाम्बी श्रीकांतचा समावेश होता. (वृत्तसंस्था)

आशियाई देश दोषी
स्पर्धा रद्द होण्यास आशियाई देशांची माघार कारणीभूत असल्याची टीका माजी भारतीय कोच विमलकुमार यांनी केली.

Web Title: Thomas and Uber Cup badminton tournament postponed, decision due to withdrawal of six teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.