पाटणा संघाचा सलग तिसरा विजय

By Admin | Updated: February 7, 2016 03:20 IST2016-02-07T03:20:00+5:302016-02-07T03:20:00+5:30

प्रदीप नरवालच्या नेतृत्वाखालील पाटणा पाइरेट््सने बचाव व आक्रमणाचा उत्तम मेळ साधत यू मुंबाचा स्टार स्पोर्टर्््स प्रो कबड्डी लीग स्पर्धेत शनिवारी ४०-२६ ने एकतर्फी पराभव केला.

Third consecutive victory of Patna team | पाटणा संघाचा सलग तिसरा विजय

पाटणा संघाचा सलग तिसरा विजय

बेंगळुरु : प्रदीप नरवालच्या नेतृत्वाखालील पाटणा पाइरेट््सने बचाव व आक्रमणाचा उत्तम मेळ साधत यू मुंबाचा स्टार स्पोर्टर्््स प्रो कबड्डी लीग स्पर्धेत शनिवारी ४०-२६ ने एकतर्फी पराभव केला. पाटणा संघाचा या स्पर्धेतील हा तिसरा विजय ठरला. कांतिरवा स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत यू मुंबा संघाने सुरुवातीला आघाडी घेतली होती, पण पाटणा संघाने चमकदार पुनरागमन करीत लढतीवर नियंत्रण मिळवले. मध्यंतराला खेळ थांबला त्यावेळी पाटाणा संघाने २०-११ अशी आघाडी घेतली होती. पाटणा संघातर्फे प्रदीपने सर्वाधिक ८ गुणांची कमाई केली तर संदीप नरवाल (४), मनप्रीत सिंग, सुरेश कुमार यांनी चांगला बचाव करताना प्रत्येकी ३ गुण वसूल केले. पाटणा संघाने तिसरा विजय मिळवताना १५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. मुंबा संघाचा चार सामन्यांतील हा दुसरा पराभव ठरला. मुंबा संघ १० गुणांसह चौथ्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Third consecutive victory of Patna team