देवळीत राज्यस्तरीय कुस्तीचा बिगुल वाजला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 07:07 PM2019-01-27T19:07:30+5:302019-01-27T19:07:47+5:30

५०० पहेलवानांची उपस्थिती : एक हजार महिला पहेलवानांचे आज आगमन

There was a state-level wrestling in Deoli | देवळीत राज्यस्तरीय कुस्तीचा बिगुल वाजला 

देवळीत राज्यस्तरीय कुस्तीचा बिगुल वाजला 

Next

देवळी (वर्धा) :  कुस्ती स्पर्धेचा रविवारी बिगुल वाजला. दिवसभर चाललेल्या सामन्यात अनेक नामवंत पहेलवानांनी आपले कसब पणाला लावले. या सर्व लढती दर्शनीय ठरल्या आहे. 
शुभारंभाला २७ ते २४ या दोन दिवसपर्यंत पुरूष ज्युनिअर गटातील ४१ ते ११० किलो वजनगटात निर्वाचक लढती होत आहेत. यासाठी राज्यभरातून ५०० पुरूष पहेलवान व १५० कुस्ती पंचांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. शुभारंभाच्या सकाळी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते कुस्ती मैदानावर बजरंग बलीच्या मूर्तीची पूजा करून सामन्याला सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे सरचिटणीस  बाळासाहेब  लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष गणेश कोहळे, नागनाथ देशमुख व सर्जेराव शिंदे, विभागीय सचिव संजय तिरथकर व सुनील चौधरी, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर, सभापती नंदू वैद्य व मारोती मरघाडे तसेच कुस्ती परिषदेच्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती. सोमवारी, २८ ला सकाळी महिला कुस्तीगीरांचे आगमन होऊन दुपारपर्यंत त्यांचे वजनगट निश्चित केले जाणार आहे.  
महिला कुस्ती स्पर्धा ज्युनिअर गटात ३६ ते ७३ वजनगटात व सिनिअर महिला दुसºया ५० ते ७६ वजन गटात रंगणार आहे. यासाठी राज्यभरातून एक हजार महिला पहेलवानांची उपस्थिती राहणार आहे. महिला कुस्त्या २९ व ३० रोजी होणार आहेत, अशी माहिती आयोजक समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title: There was a state-level wrestling in Deoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.