दबावात खेळण्याची सवय झाली : महेंद्रसिंह धोनी
By Admin | Updated: March 8, 2015 01:41 IST2015-03-08T01:41:23+5:302015-03-08T01:41:23+5:30
मी उत्कृष्ट खेळ करून संघाला विजय मिळवून देऊ शकतो,’’ असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले.

दबावात खेळण्याची सवय झाली : महेंद्रसिंह धोनी
पर्थ : ‘‘भारतीय संघ अडचणीत असताना माझ्यावरही दबाव येतो; मात्र आता नेहमीच दबावात खेळ करण्याची सवय झाली आहे़ त्यामुळेच भारतीय संघ अडचणीत आला, की मी उत्कृष्ट खेळ करून संघाला विजय मिळवून देऊ शकतो,’’ असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले.
शुक्रवारी वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या वर्ल्डकपमधील लढतीत संघ अडचणीत असताना धोनीने कर्णधारास साजेशी नाबाद ४५ धावांची खेळी करून टीमला विजय मिळवून दिला़
धोनी पुढे म्हणाला, ‘‘सर्वांना वाटते, की माझ्यावर दबाव येत नाही;मात्र सामन्यात माझ्यावरही दबाव येतो; मात्र अशा परिस्थितीत कसा खेळ करायचा याचे कसब अवगत केले आहे़ याच कारणामुळे
मी कठीण परिस्थितीतसुद्धा
आपली विकेट गमावत नाही़’’
धोनीने पुढे सांगितले, की
सन २००६च्या पाकिस्तान दौऱ्यानंतर माझ्या फलंदाजीत बरीच सुधारणा झाली आहे़ यानंतर मी सलग
तळाच्या क्रमवारीत फलंदाजी
केली आहे़ माझा नंबर बऱ्याच वेळा ३० षटकांच्या नंतरच येतो़ तेव्हा
मला परिस्थितीनुसार खेळण्यास
भाग पडते़ प्रथम फलंदाजी असल्यास मी वेगाने धावा काढतो आणि लक्ष्याचा पाठलाग करण्याची वेळ असली तरी मला विकेट राखून खेळणे गरजेचे असते, असेही हा कर्णधार म्हणाला़
(वृत्तसंस्था)
पाचव्या क्रमांकासाठी रैना उत्कृष्ट पर्याय
च्युवराजसिंग भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर सुरेश रैनाच पाचव्या क्रमांकासाठी उत्कृष्ट पर्याय आहे, असे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने म्हटले आहे़
च्वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतीत सुरेश रैना २२ धावा काढून ड्वेन स्मिथच्या गोलंदाजीवर शॉर्टपिच चेंडूवर बाद झाला होता़ त्यामुळे या खेळाडूला अशा प्रकारचे चेंडू खेळता येत नाहीत, असा मुद्दा मीडियाने उपस्थित केला होता़
च्धोनी म्हणाला, की अन्य संघांतील खेळाडूसुद्धा शॉर्टपिच चेंडूवर बाद होतात, तेव्हा कुणीही लक्ष देत नाही; मात्र रैना केवळ एकदा या चेंडूवर बाद झाला तर मोठा विषय बनला, हे चुकीचे आहे़ रैना सध्या चांगली फलंदाजी करीत आहे़ पुढच्या सामन्यात तो नक्कीच संघाच्या विजयात विशेष योगदान देईल, असा विश्वासही धोनीने व्यक्त केला़