खेळाडूंवर कोणताही दबाव नाही
By Admin | Updated: December 3, 2014 02:16 IST2014-12-03T02:16:34+5:302014-12-03T02:16:34+5:30
मालिकेत जबरदस्तीने खेळण्यासाठी कोणताही दबाव नसल्याचे, क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे (सीए) मुख्य कार्यकारी जेम्स सदरलँड यांनी स्पष्ट केले.

खेळाडूंवर कोणताही दबाव नाही
सिडनी : फिलिप ह्युज याच्या निधनाच्या सदम्यात असलेल्या खेळाडूंना पुढील आठवड्यात भारताविरुद्ध सुरू होणा-या कसोटी मालिकेत जबरदस्तीने खेळण्यासाठी कोणताही दबाव नसल्याचे, क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे (सीए) मुख्य कार्यकारी जेम्स सदरलँड यांनी स्पष्ट केले. येथील स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान आॅस्ट्रेलियाचा फलंदाज ह्युज याचा चेंडू लागून मृत्यु झाला होता. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी मॅक्सविले येथे जाण्यापूर्वी विमानतळावर सदरलँड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र, भारताविरुद्ध तयार केलेला नवीन वेळापत्रक समाधानकारक नसल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.
सदरलँड म्हणाले, खेळाडूंची मानसिकता मी समजू शकतो. त्यांच्यासाठी आपल्या मित्राची अंत्यविधी उरकुन मैदानात उतरणे सोपे नसेल. सर्व खेळाडूंना आम्ही प्रोत्साहन दिले असून त्यांच्या भावनांची कदर करायला हवी. खेळण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव नसेल. हा निर्णय त्यांच्यावरच सोपविला आहे आणि प्रत्येकाच्या वक्तिगत निर्णयाचे स्वागत करण्यात येईल.(वृत्तसंस्था)