'फिरोजशाहवर जे काही घडलं त्यात माझी चूक नाही- मनोज तिवारी

By Admin | Updated: October 25, 2015 09:16 IST2015-10-25T09:16:31+5:302015-10-25T09:16:31+5:30

'फिरोजशाह कोटला मैदानावर जे काही घडलं त्यात माझी कोणतीही चूक नव्हती... सगळं काही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय' असं स्पष्टीकरण क्रिकेटर मनोज तिवारीनं गौतम गंभीरसोबत झालेल्या हाणामारीनंतर दिलंय.

'There is no mistake in what happened to Ferozej- Manoj Tiwari | 'फिरोजशाहवर जे काही घडलं त्यात माझी चूक नाही- मनोज तिवारी

'फिरोजशाहवर जे काही घडलं त्यात माझी चूक नाही- मनोज तिवारी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.२५ -  'फिरोजशाह कोटला मैदानावर जे काही घडलं त्यात माझी कोणतीही चूक नव्हती... सगळं काही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय' असं स्पष्टीकरण क्रिकेटर मनोज तिवारीनं गौतम गंभीरसोबत झालेल्या हाणामारीनंतर दिलंय. 

अनेक गोष्टी आऊट ऑफ कंट्रोल गेल्या... एखादा जर आपल्या सीमारेषा ओलांडत असेल तर साहजिकच मलाही ते चांगलं वाटणार नाही... पण, गौतम गंभीर हा माझा सिनिअर खेळाडू आहे... म्हणून मी त्याचा आदर करतो' असं मनोज तिवारीनं म्हटलंय. तर, काहीच घडलं नसल्याची प्रतिक्रिया गौतम गंभीरनं दिलीय.
गंभीर आणि तिवारी यांच्यातील प्रकरण काय होत ?  का वाद झाला ? दोघामधील घडलेला घटनाक्रम खालिलप्रमाणे
दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीर तसेच बंगालचा कर्णधार मनोज तिवारी हे हमरीतुमरीवर आले. एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दोघांनीही दिली. पंचाने मध्यस्थी करताच त्यांनाही धक्का देण्यात आला. गंभीर आणि तिवारी परस्परांच्या अंगावर धावून आले तेव्हा पंच के. श्रीनाथ यांनी उभय खेळाडूंना समजविण्याचा व शांत करण्याचा प्रयत्न केला. गंभीरने पंचांनाही धक्का दिला. क्रिकेटमध्ये पंचांना धक्का देणे हा मोठा अपराध मानला जातो व बंदीची शिक्षादेखील होऊ शकते.
ही घटना आठव्या षटकात घडली. पार्थसारथी भट्टाचार्य याला मनन शर्मा याने बाद करताच तिवारी चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला. त्याने ‘गार्ड’ घेतल्यानंतर फलंदाजी करण्याआधी गोलंदाजाला रोखले व पॅव्हेलियनकडे पाहात ड्रेसिंग रूममधून हेल्मेट आणण्याचा इशारा दिला. तिवारी हेतुपुरस्सरपणे ‘टाईमपास’ करीत असावा, असा दिल्लीच्या खेळाडूंचा समज झाला. मनन व तिवारी यांच्यात ‘तू-तू, मै-मै’ सुरू असताना पहिल्या स्लिपमध्ये उभा असलेला गंभीर तिवारीजवळ आला आणि त्याला शिविगाळ करू लागला. तिवारीनेदेखील गंभीरला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. गंभीर म्हणाला, ‘सायंकाळी भेट तुला मारतोच!’ उत्तरात तिवारी म्हणाला, ‘सायंकाळी का, आताच बाहेर चल!’ 
 

Web Title: 'There is no mistake in what happened to Ferozej- Manoj Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.