शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

TPL Auction 2024 : आर्मेनियाच्या खेळाडूनं सर्वाधिक 'भाव' खाल्ला; सानिया मिर्झासह दिग्गजांची उपस्थिती

By ओमकार संकपाळ | Updated: September 26, 2024 12:44 IST

टेनिस प्रीमिअर लीगच्या सहाव्या हंगामासाठी बुधवारी मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडली.

मुंबईटेनिस प्रीमिअर लीगच्या सहाव्या हंगामासाठी बुधवारी मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडली. यावेळी आठ फ्रँचायझींनी खेळाडूंवर बोली लावली. आर्मेनियाची एलिना एव्हानेस्यान ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लिएंडर पेस, सानिया मिर्झा, महेश भूपती एका व्यासपीठावर दिसले. दिग्गज टेनिसपटूंसह अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि सोनाली बेंद्रे यांचीही उपस्थिती होती. चार फेऱ्यांच्या चुरशीच्या लिलावानंतर सर्व संघांनी जगभरातील गुणवान खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेऊन संघ निवडला. बंगळुरू एसजी पायपर्स, बंगाल विझार्ड्स, पंजाब पेट्रियॉट्स, हैदराबाद स्ट्रायकर्स, गुजरात पँथर्स, यश मुंबई ईगल्स, चेन्नई स्मॅशर्स आणि श्राची दिल्ली आरएआरएच टायगर्स हे आठ संघ मैदानात असतील.  खरे तर प्रथमच टेनिस प्रीमिअर लीगमध्ये खेळत असलेल्या २२ वर्षीय एलिना एव्हानेस्यान हिने सर्वाधिक भाव खाल्ला. तिला ४२.२० लाख रुपयांच्या किंमतीत प्रियेश जैन यांच्या मालकीच्या व तापसी पन्नूचा पाठिंबा असलेल्या पंजाब पेट्रियॉट्स संघाने खरेदी केले. अन्य फ्रँचायझींनी देखील एलिनाला आपल्या संघात घेण्यासाठी संघर्ष केला. तसेच पेट्रियॉट्स संघाने पुरूष गटातील प्लॅटिनम श्रेणीतील अर्जुन कढेची ५ लाख या मूळ किंमतीत खरेदी केली. याशिवाय मुकूंद ससिकुमारची ६.८० लाख रुपयांत खरेदी झाली. 

३ डिसेंबरपासून स्पर्धेला सुरुवातगतविजेत्या बंगळुरू एसजी पायपर्सच्या संघाने दोन वेळचा ग्रॅण्ड स्लॅम मिश्र दुहेरी विजेता ऑस्ट्रेलियाचा मॅक्स पर्सेल याला आपल्या संघाचा भाग बनवले. त्याला ४२ लाख रूपये मिळाले. रोहन गुप्ता यांच्या मालकीच्या व एसजी स्पोर्टसचा मुख्य अधिकारी महेश भूपती यांचा पाठिंबा असलेल्या बंगळुरू संघाने लिलावात उशिरा भाग घेतला. पण, तरी देखील त्यांनी ऑलिम्पिकपटू अंकिता रैनाला ५ लाख देऊन आपल्या ताफ्यात घेऊन संघाची ताकद वाढवली. याशिवाय त्यांनी अनिरुद्ध चंद्रशेखरला ४ लाख रुपयांत आपल्याकडे खेचले.

टेनिस आयकॉन म्हणून ओळख असलेल्या सानिया मिर्झाचा गतवर्षीच्या उपविजेत्या बंगाल विझार्ड्स संघाला पाठिंबा आहे. त्यांनी क्रोएशियाच्या पेट्रा मॅट्रिकला ३५ लाख रुपयांत खरेदी करताना बरीच बचत केली. तसेच बंगालने श्रीराम बालाजी (६.२० लाख) आणि निकी पोनाच्चा (३.८० लाख) यांना आपल्या संघात घेतले. टेनिस प्रीमिअर लीगचा सहावा हंगाम ३ ते ८ डिसेंबर २०२४ दरम्यान मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या टेनिस संकुलात पार पडेल. 

कोण कोणत्या संघात 

  1. बंगळुरू एसजी पायपर्स - अंकिता रैना, मॅक्स पुरसेल, अनिरुद्ध चंद्रशेखर
  2. बंगाल विझार्ड्स - पेट्रा मॅरीक, श्रीराम बालाजी, निक्की पोनाच्चा
  3. पंजाब पेट्रियॉट्स - एलिना एव्हानेस्यान, अर्जुन काढे, मुकुंद ससिकुमार
  4. हैदराबाद स्ट्रायकर्स - हॅरिट डार्ट, बेन्जमिन लॉक, विश्नू वर्धन
  5. गुजरात पँथर्स - सहाजा यमलापल्ली, सुमित नागल, विजय सुंदर
  6. यश मुंबई ईगल्स - जॅकलीन ख्रिस्तियन, करण सिंग
  7. चेन्नई स्मॅशर्स - कोनी पेर्रीन 
  8. श्राची दिल्ली आरएआरएच टायगर्स - इर्याना शायमानोविच
टॅग्स :TennisटेनिसSania Mirzaसानिया मिर्झा