शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

टीम इंडियाने ‘जमिनीवर’ यावे : सचिन

By admin | Updated: February 18, 2015 01:56 IST

प्रतिस्पर्धी संघाला धोका पोहोचवू शकतो, म्हणून त्यांनी जमिनीवर येवून वास्तवाचे भान ठेवावे, असा सल्ला सचिन तेंडुलकर याने दिला आहे.

नवी दिल्ली : वर्ल्डकपमधील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर शानदार विजय मिळविल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला असला तरी त्यांना फाजील आत्मविश्वास नडू शकतो; कारण येत्या रविवारी होणाऱ्या लढतीत टीम इंडियाला बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचे आहे़ चोकर्स नावाने प्रसिद्ध हा संघ केव्हाही प्रतिस्पर्धी संघाला धोका पोहोचवू शकतो, म्हणून त्यांनी जमिनीवर येवून वास्तवाचे भान ठेवावे, असा सल्ला सचिन तेंडुलकर याने दिला आहे.सचिन म्हणाला, ‘‘बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला विजय मिळवायचा असेल, तर सलामीवीर फलंदाजांनी मजबूत सुरुवात करून देणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर या संघाविरुद्ध एकेरी आणि दुहेरी धावा काढताना विशेष खबरदारी घ्यावी लागेल़ कारण क्षेत्ररक्षणात या संघाला तोड नाही़ वर्ल्डकपच्या जेतेपदाचे दावेदार संघात आफ्रिकेचा समावेश आहे़ त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल़’’ मास्टर ब्लास्टर म्हणाला, ‘‘पाकिस्तानच्या तुलनेत आफ्रिका संघ अधिक मजबूत आहे़ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात या तीनही विभागांत संघ इतर संघांच्या तुलनेत पुढे आहे़ विशेषत: वेगवान गोलंदाज डेल स्टेनसमोर भारतीय खेळाडूंची खरी कसोटी राहील़ या सामन्यात भारताचा अनुभवी खेळाडू रोहित शर्मावर सर्वांची नजर राहील’’़ टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर कुण्या एका खेळाडूवर अवलंबून न राहता खेळाडूंनी सांघिक कामगिरी करणे गरजेचे आहे़ असे झाल्यास टीम इंडियाला विजयापासून कुणीच रोखू शकत नाही, असेही सचिन तेंडुलकर याने म्हटले आहे़ (वृत्तसंस्था)भारतीय संघ अडीच महिन्यांपासून आॅस्ट्रेलियामध्ये आहे़ कर्णधार या नात्याने खेळाडू तंदुरुस्त राहावेत, अशी माझी इच्छा आहे़ त्यामुळे पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयानंतर आम्ही मंगळवारी सराव न करता विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला़ एक दिवस मिळालेल्या विश्रांतीमुळे नक्कीच खेळाडू नव्या उत्साहाने मैदानात उतरून विजयी अभियान कायम राखतील, असा विश्वास आहे़- महेंद्रसिंह धोनी, कर्णधार टीम इंडियाभारत आफ्रिकेला पराभूत करण्यास सक्षम : लक्ष्मण च्वर्ल्डकपमध्ये २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची बाजू वरचढ मानली जात असली तरी भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही़व्ही़एस़ लक्ष्मण याने टीम इंडिया आफ्रिकेला पराभूत करण्यास सक्षम आहे, असे म्हटले आहे़च्लक्ष्मण म्हणाला, की आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी आणि वन-डे मालिकेत भारताला लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नव्हता; मात्र पाकिस्तानविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे भारतीय संघात नवीन उत्साह संचारला आहे़ याच बळावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पराभूत करील़च्गत अडीच महिन्यांपासून भारतीय संघ आॅस्ट्रेलियात आहे़ त्यामुळे येथील वातावरणाची टीम इंडियाला सवय झाली आहे, तसेच वेगवान आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळण्याची आता भारतीय फलंदाजांना सवय झाली आहे़ त्यामुळे भारतीय संघ आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज डेल स्टेन, मोर्ने मोर्केल, इमरान ताहिर यांचा सहज सामना करू शकतो, असेही लक्ष्मण याने सांगितले़