टीम इंडिया सराव सामना आज
By Admin | Updated: August 22, 2014 01:13 IST2014-08-22T01:13:26+5:302014-08-22T01:13:26+5:30
कसोटी मालिकेत 1-3 ने लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीम इंडिया व संघव्यवस्थापनामध्ये मोठे फेरबदल झालेले आहेत.

टीम इंडिया सराव सामना आज
लंडन : कसोटी मालिकेत 1-3 ने लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीम इंडिया व संघव्यवस्थापनामध्ये मोठे फेरबदल झालेले आहेत. नव्या रूपातील भारतीय संघ ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर शुक्रवारी मिडलसेक्सविरुद्ध वन-डे सराव सामन्यासाठी उतरेल त्यावेळी संघासह नवनियुक्त संचालक रवी शास्त्रीपुढे बरेच काही सिद्ध करण्याचे आव्हान राहणार आहे.
भारताचा माजी अष्टपैलू रवी शास्त्रीकडे संघाच्या संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघाचे मनोधैर्य उंचावण्याची जबाबदारी शास्त्रीवर आहे. भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान मालिकेतील पहिला वन-डे सामना 25 ऑगस्ट रोजी ब्रिस्टलमध्ये खेळल्या जाणार आहे. कर्णधारपदाबाबत टीकाकारांचे लक्ष्य ठरलेला महेंद्रसिंग धोनी वन-डे मालिकेपूर्वी पहिल्या सराव सामन्यात विजयी सुरुवात करण्यास उत्सुक आहे. सराव सामन्यात विजय मिळविला तर भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल.
(वृत्तसंस्था)