शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

Graham Reid Team India Hockey Coach: दुष्काळ संपवला तरी...! वर्ल्डकपमध्ये लाजिरवाणा पराभव, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांसह तिघांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 17:19 IST

या तिघांनीही राजीनामा दिलेला असला तरी ते पुढील तीन महिने नोटीस पिरिएडवर असतील.

एकीकडे क्रिकेटमध्ये अंडर १९ महिलांनी वर्ल्डकप जिंकून आणलेला असताना दुसरीकडे हॉकी वर्ल्डकपमध्य़े टीम इंडियाचे बेकार प्रदर्शन झाले. ओडिशात झालेल्या या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ क्वार्टरफाइनलमध्ये देखील पोहोचू शकला नव्हता. या खराब कामगिरीनंतर टीम इंडियाचे हेड कोच ग्राहम रीड यांनी राजीनामा दिला आहे. 

रीड व्यतिरिक्त विश्लेषण प्रशिक्षक ग्रेग क्लार्क आणि वैज्ञानिक सल्लागार मिचेल डेव्हिड पेम्बर्टन यांनीही राजीनामा दिला आहे. हॉकी इंडियाने या तिघांचे राजीनामे स्वीकारले आहेत. 58 वर्षीय रीड यांनी भुवनेश्वरमध्ये विश्वचषक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.

माझ्या पदावरून पायउतार होण्याची आणि पुढच्या व्यवस्थापनाकडे लगाम सोपवण्याची वेळ आली आहे. भारतीय संघ आणि हॉकी इंडियासोबत काम करणे हा एक सन्मान होता. प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला आहे. मी संघाला शुभेच्छा देतो, असे रीड म्हणाले. 

या तिघांनीही राजीनामा दिलेला असला तरी ते पुढील तीन महिने नोटीस पिरिएडवर असतील. ऑस्ट्रेलियन प्लेयर राहिलेल्या रीड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले होते. तसेच बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि FIH प्रो लीग 2021-22 हंगामात तिसरे स्थान मिळवले आहे. तर  २०१९ मध्ये FIH वर्ल्ड सिरीज फायनल देखील जिंकली होती. 

टॅग्स :Hockeyहॉकी