लहरा दो...! भारत आशियाई चॅम्पियन्स; मलेशियावर रोमहर्षक विजय अन् झटका पाकिस्तानला

By ओमकार संकपाळ | Published: August 12, 2023 10:32 PM2023-08-12T22:32:52+5:302023-08-12T22:32:59+5:30

India vs Malaysia Hockey Asian Champions Trophy Final : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने उतरला अन् विजय साकारला.

Team India has clinched the Asian Champions Trophy for the 4th time, India wins 4-3 - IND vs MAS final in Asian Champions Trophy Hockey 2023 | लहरा दो...! भारत आशियाई चॅम्पियन्स; मलेशियावर रोमहर्षक विजय अन् झटका पाकिस्तानला

लहरा दो...! भारत आशियाई चॅम्पियन्स; मलेशियावर रोमहर्षक विजय अन् झटका पाकिस्तानला

googlenewsNext

Asian Champions Trophy Hockey 2023 | चेन्नई : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने उतरला अन् विजय साकारला. शेवटच्या क्वार्टरपर्यंत रंगलेल्या या लढतीत यजमानांनी रोमहर्षक विजय मिळवला. आकाशदीप सिंगने भारताला जबरदस्त पुनरागमन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ५६ व्या मिनिटाला त्याच्या मैदानी गोलने भारताने ४-३ अशी आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये मलेशिया ३-१ असा आघाडीवर होता. पहिल्या हाफपर्यंत ३-१ ने आघाडीवर असलेल्या मलेशियाला ताब्यात ठेवण्यात भारताला यश आले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने जबरदस्त पुनरागमन करत ३-३ अशी बरोबरी साधली होती. 

भारतीय संघाने एका मिनिटात दोन गोल करत स्कोअर ३-३ असा केला. हाफ टाईमनंतरही भारताने प्रतिआक्रमण सुरूच ठेवले. सामन्याच्या ४५व्या मिनिटाला भारताच्या काउंटर अॅटॅकवर मलेशियाला त्याच्या बॉक्समध्ये फाऊल करण्यात आले तेव्हा त्याचे फळ मिळाले. यावर रेफ्रींनी भारताला पेनल्टी स्ट्रोक दिला. यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत स्कोअर ३-२ असा केला. त्याच मिनिटाला गुरजत सिंगने काउंटर अटॅकवर मैदानी गोल करत स्कोअर ३-३ असा केला. 

अखेरच्या क्वार्टरमध्ये गोल अन् भारत चॅम्पियन

चौथ्या क्वार्टरमध्ये अर्थात शेवटची १५ मिनिटे चॅम्पियन्स कोण याचा निकाल देणारी होती. या शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने मलेशियावर ४-३ अशी आघाडी घेतली, आकाशदीपने चौथा गोल करून पाच वर्षांच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. भारताने ४ वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. पाकिस्तानने २०१२, २०१३ व २०१८ ( भारतासह संयुक्त जेतेपद) असे तीन जेतेपद जिंकली होती.  विशेष बाब म्हणजे भारताने पहिला गोल करून श्रीगणेशा केला होता. जुगराज सिंगने नवव्या मिनिटाला गोल करत भारतीय संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्यानंतर भारताची गाडी रूळावरून घसरली. पाहुण्या मलेशियाने प्रतिआक्रमण सुरूच ठेवले अन् 14व्या मिनिटाला अझराई अबू कमालने केलेल्या मैदानी गोलच्या जोरावर मलेशियाने बरोबरी साधली. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये अठराव्या मिनिटाला रहीझ राजीने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि २८व्या मिनिटाला मोहम्मद अमिनुद्दीनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत आपल्या संघाला भारताविरुद्ध २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

भारताला बचाव करताना अपयश येत होते. याचाच फायदा घेत मलेशियाने एकामागून एक अनेक काउंटर अटॅक केले. खरं तर भारताने अनेक सोपे पेनल्टी कॉर्नरही वाया घालवले.अशाप्रकारे मलेशियाने ३-१ अशी आघाडी कायम ठेवली आहे. पण, तिसऱ्या क्वार्टरमध्ये यजमानांनी आपल्या चाहत्यांना जागे केले. सलग दोन गोल करून भारतीय शिलेदारांनी ट्रॉफीच्या दिशेने कूच केली. 

गोल करणारे शिलेदार -

  1. जुगराज सिंग (भारत) - नववा मिनिट
  2. अबू कमला अझराई (मलेशिया) - चौदावा मिनिट
  3. राइझ रहीम (मलेशिया) - अठरावा मिनिट
  4. अमिनुद्दीन मुहम्मद (मलेशिया) - २८वा मिनिट
  5. हरमनप्रीत सिंग (भारत) - ४५वा मिनिट
  6. गुरजत सिंग (भारत)- ४५वा मिनिट
  7. आकाशदीप सिंग (भारत) - ५६वा मिनिट


जपानला धूळ चारून भारताची फायनलमध्ये धडक
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने जपानचा पराभव करून फायनलचे तिकिट मिळवले होते. जपानविरूद्धच्या पराभवासह हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वातील भारताने तब्बल पाच वर्षांनंतर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. खरं तर भारताने २०११, २०१६ व २०१८ मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत जपानचा धुव्वा उडवला. भारताने जपानचा तर मलेशियाने दक्षिण कोरियाचा पराभव करून फायनलचे तिकिट मिळवले होते. उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानचा पराभव करताना भारताकडून, आकाशदीप सिंग ( १९ मि.) , हरमनप्रीत सिंग ( २३ मि.), मनदीप सिंग ( ३० मि.), सुमित ( ३९ मि.) आणि सेलवम कार्थी ( ५१ मि.) यांनी गोल करून भारताचा ५-० असा विजय पक्का केला. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या हॉकी संघाने अपराजित राहून अंतिम फेरीत स्थान मिळवले. 

Web Title: Team India has clinched the Asian Champions Trophy for the 4th time, India wins 4-3 - IND vs MAS final in Asian Champions Trophy Hockey 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.